उघडीप

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

आज पुन्हा उघडीप आहे.. थोडी थोडी
उन्हाचीही तिरीप आहे.. थोडी थोडी
पुन्हा मळभ येण्याआधी
झुळूक दूर जाण्याआधी
चल, जमवून घेऊ मैफल .. थोडी थोडी

(सहज सुचलेल्या चार ओळी..)

प्रकार: 

ओळी छान आहेत मीनू.. पण चार नाही काही पाच आहेत की Happy

मीनू, तो शब्द 'उघडीप' असा आहे ना? cbdg
मग 'तिरीप' पण जुळेल छान. Happy

लालु, २र्‍या ओळीत तिरिप हा शब्द आला आहे ना.. कवितेत एकच शब्द अनेकदा आला की रसभंग होतो..

हे हे माझ्या मते शब्द उघडीक असाच आहे. ... आणि लाले तिथे यमक जुळवायची गरज नाहिये

~~~~~~~~~
~~~~~~~~~
Happy

मीनू , मस्त चारोळी !!
बी, माझ्या मते लालू ला म्हणायचय की, उघडीक पेक्षा उघडीप जास्त योग्य आहे,
आणि पहिल्या ओळीत उघडीप वापरलं तर दुसर्‍या ओळीतल्या तिरिप सोबत तो छान जाईल !!

-- शकुन

मस्त लिहिलयेस मीनु.. थोडं थोडं नाही खुप आवडलं... Happy

मलाही वाटतं शब्द उघडीप आहे उघडीक नाही..

सरीवीना, शकुन, बी, लालू धन्यवाद.. मी बघते काय नक्की शब्द आहे ते.
~~~~~~~~~
~~~~~~~~~
Happy

लाले तो श्ब्द उघडीपच आहे गं ! चला यमक पण जुळलं बघ. Proud

~~~~~~~~~
~~~~~~~~~
Happy