बनपुरी

Submitted by लक्ष्मी गोडबोले on 11 March, 2014 - 06:39
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ किलो मैदा

१२ केळी

दोन वाटी दही

जिरे

साखर

क्रमवार पाककृती: 

एक किलो मैदा, १२ केळी , लागेल तितके दही घालावे. साखर, जिरे मिसळून मळून रात्रभर ठेऊन द्यावे.

सकाळी त्याच्या पुर्‍या करुन तळाव्यात

वाढणी/प्रमाण: 
-
अधिक टिपा: 

इडलीवडा वाल्या कर्नाटकी आण्णाच्या दुकानात आज हा नवीन पदार्थ दिसला, त्याने रेसिपी दिली.

पुर्‍या अगदी स्पाँजी होतात. तेलही जास्त पीत नाहीत.

मैद्याऐवजी गव्हाचे पीठ / आटा वापरुन करता येईल का?

या पुर्‍या दोन दिवस टिकतात.

कसलीही भाजी, चटणी, सांबार याबरोबर खाता येतात. नुसत्या खाल्ल्या तरी छान लागतात.

माहितीचा स्रोत: 
दुकानवाला
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्रमवार पाककृती:
एक किलो मैदा, १२ केळी , लागेल तितके दही घालावे. साखर, जिरे मिसळून मळून रात्रभर ठेऊन द्यावे.

सकाळी त्याच्या पुर्‍या करुन तळाव्यात>>>>.. मैदा+ केळी+ दही+ साखर्+जीरे असे सर्व अख्खेच घ्यावे? केळी न सोलता? Uhoh

अहो लगो जरा क्रमवार कृती लिहा की. हे म्हणजे असे झाले की सकाळी घाईत आहे म्हणून साखर आणी चहा पावडर खाल्ली, त्यावर गरम पाणी व गरम दूध प्यायले. पोटात गेले की झालाच चहा.:फिदी: जरा जरा शेक शेक करावे लागेल चहा उकळायला.:डोमा:

कर्नाटकात खरच हा प्रकार खूप आवडीने खाल्ला जातो आणि अनेक रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफस्ट साठी इडली-वड्याबरोबरीने हजर असतो..:)
अनिलभाई, एक किलो मैद्यासाठी चालू शकतील बहुतेक बारा केळी.. घरी बनवायचे तर एवढ्या प्रमाणात करायची गरज नाही.. उरलेली, जास्त पिकलेली केळी मिक्सर किंवा फु़ड प्रोसेसर मध्ये फिरवून घ्यावीत, त्यातच जिरे,चवीपुरते मीठ व दही घालून, त्यात मावेल एवढा मैदा/कणीक घालून फिरवावे. (विकतची नक्कीच मैद्यची असते पण घरी कणकेची करू शकता.. ) पीठ फार कडक होउ न देता मऊसर राहू द्यावे.. सकाळी ते जरासे आंबून फुगलेले दिसेल.. तेलाच्या हाताने गोळे करून जराशी जाडसर पुरी बनवावी.. मध्यम आचेवर खरपूस तळावी. आतून साधारण ब्रेडसारखे टेक्शर येते.. ह्या सोबत नारळाची चटणी व कुर्मा दिला जातो..

अच्छा हे दोन ठिकाणी लिहिलं आहे तर.. मग आता हे पोस्ट डिलिट करु का ? मला एकच कशी लिंक दिसली.. एवढ्या चविष्ट प्रकारावर चर्चा दिसली नाही म्हटल्यावर रहावले नाही असलेली माहिती लिहिल्यावाचून.. Sad