यंदाचा माझा वाढदिवस :)

Submitted by के अंजली on 8 December, 2013 - 21:45

अकरा डिसेंबर ला माझा वाढदिवस..

यंदाच वेगळेपण म्हणजे तो तारखेने ११-१२-१३ असा आलाय! Happy

अगदी धागा वगैरे काढून सांगायचं कारण इतकंच की मला हे शेअर करावसं वाटलं म्हणून Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्म्म.. ११-१२-१३ या आयुष्यात एकदाच क्रमवार अशा आलेल्या / येणार्‍या तारखेनिमित्त वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

व्वा अंजली, मस्तच. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. या युनिक तारखेला अशी काही तरी वस्तु घे की त्यावर ही तारीख प्रिन्ट करून मिळेल.
११-१२-१३ या तारखेला ११ वाजून १२ मिनिटांनी आणि १३ व्या सेकेन्दाला डिजीटल कॅमेरयाने एक फोटो काढ ज्यात ही तारीख आणि वेळ प्रिंट होऊन येईल. तो फोटो मस्त फ्रेम करून घे .
मी १०-१०-१० या तारखेला असे केले होते. माझा आणि नवर्याचा फोटो रात्री १० वाजून १० मिनिटांनी आणि १० व्या सेकेन्दाला काढला होता...:-)

छान योग आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! Happy

माझ्या पहिल्या शाळेची (कोकण) ही जन्मतारीख आहे. ११-१२-१९१३. माझे वडील खूप वेळा आठवणीने सांगतात. ते त्या शाळेत शिक्षक होते. Happy

सामी, मस्त आयडीया.

७ / ७ / ७७ हा माझा कॉलेजमधला पहिला दिवस. त्यादिवशी मैत्री झालेला एक मित्र अजूनही माझा मित्र आहे.
८/८/८८, ९/९/९९ , १०/१०/१० अशा तारखांना आम्ही मैत्रीचे वाढदिवस साजरे केले.

अंजली आधीच अभिनंदन... आणि खूप खूप शुभेच्छा.

म्हणजे नेमका कितवा? ११वा,१२वा की १३वा? >> वाटलंच होतं मला हा प्रश्न देव काकांशिवाय दुसरं कुण्णी कुण्णी विचारूच शकत नाही.

हार्दिक शुभेच्छा अन्जली. वाढदिवस मस्त साजरा कर. माझ्या वतीने केक जरुर काप. तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे.

सहिये.. हॅपी बड्डे.. !!!!

कालच मी अशीच एक गंमत पाहिली..
माझा महिन्याचा ट्रेनचा पास जो गेल्या १२ तारखेला काढलेला तो या ११ तारखेला संपतोय..

म्हणजे,
१२-११-१३ ते ११-१२-१३ Happy

आणि हो, आता पुढची ९० एक वर्षे तरी असल्या गंमती घडणार नाहीत Wink

खरंय अभिषेक! म्हणून तर इथे शेअर करावसं वाटलं ना Happy

श्री,बाजिराव,जाई अनिश्का,हर्पेन्,दिनेशदा,मंजू,स्नेहनिल,दादाश्री,बेफि,देवकाका,अर्निका,सामी
सस्मित,पियुपरी,शोभा,चनस,प्रिया,दक्षिणा,रश्मी,भारतीताई आणि अभिषेक..

आवर्जून शुभेच्छा दिल्यात! थँक्यू !!:)

सामी तुझी आयडीया खूप आवडली. आठवणीने काहितरी घेऊन त्यावर तारिख टाकते आता. धन्यवाद!

सस्मित आणि प्रिया.. माझ्या वतीने त्यांनाही शुभेच्छा द्या आठवणीने.

शोभा छानेय आठवण तुझी..
दिनेशदा किती छान.. रश्मी..नक्की Happy

भारतीताई Happy

एका मित्राने मागच्या वर्षी १०-११-१२ असा वाढदिवस साजरा केला होता.

तुम्हाला वाढदिवसाच्या अ‍ॅडव्हान्स शुभेच्छा.

Pages