पुराणातील कथा

Submitted by नंदिनी on 16 November, 2012 - 06:21

इथे तुम्हाला माहित असलेल्या वेगवेगळ्या रोचक पुराणकथा लिहा. हिंदू, बौद्ध, जैन, इस्लाम, ख्रिस्ती, ग्रीक, रोमन आणि इतर धर्मांतील व देशांतील कथा माहित असतील तर इथे लिहा. हा बाफ अशा कथांच्या संकलनाकरता आहे. त्या कथांची सत्यासत्यता तपासण्यासाठी अथवा वैज्ञानिक कसोट्या लावण्यासाठी नाही.

इथे टिंगलटवाळी करणारे, एखाद्या धर्माला उद्देशून चेष्टा-मस्करी करणारे लिखाण करू नये ही विनंती.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ असामी....

"...ज्या गोष्टी/प्रवाद्/समज्/प्रथा रुढ झाल्या, त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसारच बघितल्या पाहिजेत...." ~ सत्यवचन. पुराणच काय वा संस्कृती इतिहास यांच्या [इच्छुक] अभ्यासकाने कोणत्याही पूर्वग्रहदूषितेचा चष्मा डोळ्यावर न चढविताच या गर्द किर्र रानात प्रवेश करणे गरजेचे असते. अमुक एका गोष्टीविषयी, प्रवादाविषयी "आज" भले तुमचे वैयक्तिक मत काहीही असो, पण घडून गेलेल्या घटनांविषयी, त्याच्या सत्यतेविषयी, विशिष्ट धारणेविषयी वा "पुराणा" तील वर्णनाविषयी तुम्ही आजचा स्टेथॉस्कोप त्या त्या प्रसंगांना लावून चालत नाही. तसे केलेत की मग तुम्ही 'अभ्यासक' न राहता 'प्रचारक' बनता.....जे अन्यांमध्ये कटुता निर्माण करू शकते.

@ बागुलबुवा ~ 'योगीनीं' विषयी नंतर इथेच लिहितो.

कुंतीला चिरतारुण्याचा शाप का वरदान मिळाले होते असे वाचण्यात आले होते...मग त्याचा अर्थ ती अजून जिंवत असेल का मरेपर्यंत तारुण्य....???

अश्वत्थामा हा बर्‍हाणपूरच्या जंगलात असल्याचे काहींचे म्हणणे आहे. ( म.प्रदेश). नर्मदा परीक्रमा करतांना श्री टेंबेस्वामींना तो भेटल्याचे लिहीलेले वाचले होते. बर्‍हाणपूरचे जंगल खरेच घनदाट आहे, रेल्वेतुन जाताना ते अक्षरशः वेगळेच दिसले. जितेंद्रच्या पाताल भैरवी सिनेमात त्यात थोडे शुटिंग केले गेलेय.

कुणी जोशी म्हणून माणसाने पण अश्वत्थामा भेटल्याचे सांगीतले. खखोदेजा.

टुनटुन,
अस्तंबा नावाचं शिखर आहे सातपुड्यात. हा तोच भाग आहे, ज्याला दंडकारण्य म्हणत.
आजचा मुंबई अग्रा रोड जिथून जातो, तिथून अगदी ब्रिटिश राज्यापर्यंत जाता येत नसे. वर जायचं तर बर्‍हाणपूर मार्गे, किंवा गुजरातेतून. इतकं ते घनदाट अरण्य होतं. नंतर महाराष्ट्राच्याच क्ष्क्षक्ष्नी कापून खाल्लं, ती बाब अलाहिदा..
तर अस्तंबा म्हणजे अश्वत्थामा. तिथे सातपुड्यातल्या आदिवासींची यात्राही भरते दर वर्षी.

मग बळीराजाला वामन अवतार घेऊन पाताळात का लोटले???
>>
याबद्दल कोची मध्ये असताना ऐकलं होतं
तो कितीही चांगला असला तरी राक्षस कुळातलाच होता. शक्तिमान होताच
आणि खुप पुण्यवान ही होता
मग (नेहमीप्रमाणे) इंद्राला आपल्या सिंहासनाची काळजी वाटायला लागली आणि त्याने विष्णूकडे धाव घेतली की याला भुतलावरून नष्ट करा.
मग विष्णुने वामन अवतार घेऊन त्याला जमिनीत गाडून टाकले
पण तो पुण्यवान होता तेंव्हा त्याने विष्णूकडून असा आशिर्वाद मागून घेतला की तो वर्षातून एकदिवस बाहेर येऊन त्याचं राज्य लोकं कस सांभाळतायेत ते पाहून जाईल
म्हणुन मग केरळात ओणम साजरा केला जातो. त्यादिवशी बळी राजा बाहेर येतो तेंव्हा आपण त्याचं राज्य नीट कुशल मंगल ठेवलय हे दाखवायला सगळं राज्य सुशोभित केलं जातं, जेवायला गोड धोड केलं जातं
(ही सगळी ऐकिव माहिती आहे. माझ्याकडे कुठलाही पुरावा नाही.)

फक्त हनुमान हा एकमेव असा 'चिरंजीव' आहे की ज्याचा अंत 'ब्रह्मा' सोबतच होईल. दुसर्‍या शब्दात हा विश्वाचा पसारा जोपर्यंत टिकून राहिल तो पर्यंत केवळ हनुमान हाच एकमेव चिरंजीव म्हणून मानवासोबत राहील.
>> मी ह्याच बरोबर एके ठिकाणी असंही वाचलय की हनुमान ही पण एक गादी आहे. एका ब्रह्माच्या काळात सात हनुमान असं काहीतरी वाचलेलं. सूर्य, इंद्र, व्यास आणि इतर अनेक गाद्या आहेत हे लहानपणी आजोबांकडून ऐकलेलं पण मारुतीरायाबद्दल नव्हतं, त्यामुळे अर्थातच ते आरामात पटलं नाही (आणि सगळं पटायची गरजही नाही म्हणा :))
लिंक सापडली तर पोस्ट करते, पण जवळपास वर्ष होऊन गेलं वाचून, त्यामुळे अवघड आहे सापडणं.

ईब्लिस >> अश्वत्थामाला पांडवाच्या मुलांना मारलं म्हणून नाही तर.....
पोस्टवॉर अर्जुन्-अश्वत्थामा वन-टू-वन कॉम्बॅटीदरम्यान कृष्णाच्या विनंतीवरून फॉर-ग्रेटर-गूड अर्जुनाने अश्वत्थामावर सोडलेले मासडिस्ट्रक्शन वेपन नारायणास्त्र मागे घेतले पण अश्वत्थामाला मात्र स्वतःचे नारायणास्त्र मागे घेणे काही जमले नाही म्हणून मग त्याने ते पांडव निर्वंश करण्याचे दुर्योधनाला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी ऊत्तरेच्या पोटातल्या गर्भाकडे (परिक्षिताकडे) वळवले. नारायणास्त्र एकदम हुकमी अस्त्र असल्या कारणाने त्याने आपले काम चोख बजावले.
पण त्याच्या ह्या नृशंस कृतीचा कृष्णाला प्रचंड राग आला आणि त्याने अश्वत्थामाला 'नेवर टू रेस्ट' असा शाप देत त्याची मणिलाल पदवी काढून घेतली. तो स्वतः नारायणाच अवतार असल्याने त्याने अस्त्राचा ईफेक्ट अनडन करून गर्भाला (परिक्षिताला) पुन्हा जीवन प्रदान केले.

ओएम्जी!
सो इट वॉज लाईक दॅट! थँक्स हं चमन फॉर सो सक्सिंटली एक्स्प्लेनीम्ग दोज पुराणाज, इन टुडेज लाईव्ह ल्यांग्वेज सो दॅट एव्हरीवन कॅन अण्डरस्टँड.

बट हाऊ कॅन अ मास डिस्ट्रक्शन वेपन डिस्ट्रॉय ओन्ली वन गर्भा? मस्ट बी स्पेशल वेपन सद्दामकडे होतं तसं? अ‍ॅण्ड मणिलाल वॉज अ पदवी? देन व्हाय इट क्रिएटेड अ भळभळणारी वुण्ड ऑन हिज फोरेड?

पण बिफोर दॅट अल्सो अश्वत्थामाने शिबिरात येऊन कत्तल केली होती ना? अन अल्टिमेटली त्यानेच परिक्षिताला मारलं असं होतंय ना?

<कुंतीला चिरतारुण्याचा शाप का वरदान मिळाले होते असे वाचण्यात आले होत>

तारुण्याचे की कौमार्याचे?

कर्ण कुंतीच्या कानातून बाहेर आला म्हणून त्याचे नाव कर्ण?

प्राचीन ग्रंथांचा अर्थ लावणे सोपे नाही. त्यासाठी अभ्यास असायला हवा. दुर्दैवाने सर्वांचा सर्वंकष अभ्यास असू शकत नाही. अभ्यासकांची गोष्ट वेगळी. पण त्यांच्यातही एकमत आढळून येत नाही. हिंदूंबरोबर ग्रीकपुराणांनाही ते लागू पडते. एकाच/ समकालीन ग्रंथात असलेला विरोधाभास हा मार्गदर्शक ठरू शकतो. उदा. महाभारतात पुत्रप्राप्तीसाठी राजगुरूकडून नियोग संततीचा आधार घेतल्याचे दिसते. रामायणातही राजगुरूंकडून प्रसाद दिल्याची रूपककथा पुढे येते. एका ठिकाणी स्पष्टपणे नियोग संततीचा उल्लेख तर दुसरीकडे रूपक का असा प्रश्न पडतो. याच रामायणात एका परीटाकडून सीतेच्या पातिव्रत्याबद्दल शंका घेतल्याची चर्चा कानी पडल्यानंतर सीतेला वनवास भोगावा लागतो. तिला अग्निपरीक्षाही द्यावी लागते आणि शेवटी तिला धरणीप्रवेश करावा लागतो. यावरून एकाच वेळी नियोगसंतती मान्य होती तसेच पातिव्रत्याला अनन्यसाधारण महत्व असल्याचेही दिसते. हा विरोधाभास कदाचित दोन संस्कृतीत असावा. पुराणं हा इतिहास असल्याने तो एकाच चष्म्यातून लिहीला गेल्याची शक्यताही गृहीत धरावी लागते. लिखीत पुराणांचा काळ हा घटना घडून गेल्यानंतर हजारो वर्षे पुढचा असल्याने मधल्या काळातले प्रक्षेप, ग्रंथकाराची भर यामुळेही हे विरोधाभास असावेत असं वाटतं. हे माझे वैयक्तिक मत.

अहो ते कृष्णराव प्रेझेंट होते हो तिथे, मग ते असले की सगळं त्यांच्या प्लानिंग प्रमाणेच होतं.
आऊट ऑफ प्लॅन काही झाले तरी ते बरोबर त्या अनअटेंडेड कॉन्सिक्वेन्सला पटकन प्लॅनचा भाग बनवून टाकायचे. द धुरंधर राजकारणी यू नो.

ते मणिलालचे असेच गंमतीने लिहिले होते. कृष्णाने त्याचा शिरोमणि काढला ते बरोबर आहे.

जाऊद्या! नंदिनीने ईथे टिंगल करायची नाही असं लिहिलं आहे आपण तो आदेश पाळू.

नारायणास्त्र (की ब्रम्हास्त्र) बद्दल तुमची शंका बरोबर आहे, त्याचीही काहीतरी कथा आहे आठवली की लिहितोच. ह्यात व्यासमुनींचाही काहीतरी रोल आहे कारण अश्वत्थामा त्यांच्या आश्रमात लपलेला असतो. पण नक्की काय रोल आहे ते आठवत नाहीये.
शिबिरात अश्वत्थामाने पांडव समजून मारले ते द्रौपदीचे मुलगे होते. ऊपपांडव.
परिक्षित अर्जुन-द्रौपदीचा नातू होता, अभिमन्यूचा मुलगा. द्वापारयुगातला बहुधा शेवटचाच राजा आणि त्याचा मुलगा जन्मेजय.

वर एका प्रतिसादात श्री.बागुलबुवा यानी 'योगीनी' विषयी मत मांडले आहे. ह्या योगीनी आणि 'साती आसरा....अप्सरा' यांचा काही संबंध असलाच तर तो फक्त दोन्ही घटक "जलदेवता" नामास पात्र मानल्या जातात इतपतच. 'आसरा' ह्या निम्फप्रमाणे मोहात पाडतात तर योगीनी स्वर्गीय देवदेवता तसेच पृथ्वीतलावर मानव कल्याणासाठी पूजाअर्चना करणार्‍या ऋषीमुनींची सेवा करतात. अर्थात ही सेवा प्रत्यक्ष समोर हजर राहूनच केली जात असते असे मानू नये. जिथे या साधूसंतांचे वास्तव्य असेल तेथील परिसर हरित ठेवणे, स्वच्छ जलाची सोय होत राहील हे पाहणे, फळबागा फुलत राहतील याकडे लक्ष देणे....थोडक्यात भक्तीमार्गावर असणार्‍या लोकांचे चित्त प्रसन्न राहील यासाठी 'निसर्ग' जे काही करेल ते ह्या योगीनींमार्फत केले जाते असे समजावे......[काही सेवाभावी लोक आणि संस्थाही अशाप्रकारचे कार्य निरलसपणे करत असतात, त्यामागची प्रेरणा म्हणजे 'योगीनी सेवे'चीच असते.]

योगीनींना दत्तात्रयाचा आशीर्वाद असल्याचे मानतात. नरसोबाच्या वाडीत असलेल्या औदुंबर वृक्षाचे महत्व सांगताना दत्त आणि योगीनीची कथा सांगितली जाते. इथे बाफवर थोडक्यात ही कथा सांगायची झाल्यास कृष्णा नदीच्या काठी असलेल्या या औदुंबर वृक्षाच्या छायेत दुपारच्या वेळेस दत्त आले की नदीचे पाणी दुभंगून ६४ योगीनी त्यांच्या सेवेसाठी अवतीर्ण होत. दत्त {आणि त्यानंतर झालेले गुरू यानाही} मग तेथील पूजेनंतर या योगीनी कृष्णा नदीच्या पात्राखाली वसलेल्या नगरीत नेत आणि मग तेथील जनांकडूनही दत्त पूजा केली जात असे......योगीनीमुळे दत्तदर्शन घडते असा समज मग प्रचलित झाल्याने आजही वाडीत दत्त दर्शनाअगोदर नदीच्या पात्राला वंदन करण्याची प्रथा तिथे दिसून येते.

[अशा रितीची कथानके जागाविस्तार भयापोटी अत्यंत त्रोटकपणे सांगण्याची इथे गरज आहे. मूळ कथानक खूपच विस्तृत प्रमाणावर असतात.....अशातर्‍हेची पुस्तकेही त्या त्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी उपलब्ध असतात. तिथेही विविध तर्‍हेने अशा कथांना साज चढविलेला असतो. त्यामुळे मी सांगत असलेली कथा हीच अंतिम आहे असे कृपया मानू नये.]

अशोक पाटील

असामी, धन्यवाद.

रिया Happy

आणि खुप पुण्यवान ही होता >>>> म्हणजे एक प्रकारे त्याच्यावर अन्यायच झाला कि.
तो पण त्या इंद्रासाठी Angry

कथेची नोंद घेतल्याबद्दल धन्यवाद कात्रेसर.

तुम्ही प्रतिसादात 'योगिनी' असे टंकले आहे अन् माझ्या दृष्टीने तेच योग्य आहे. माझ्या परिचितांपैकी दोन घरात 'योगिनी' नामक मुली आहेत. इंग्रजीमध्ये त्यांचे स्पेलिंग त्या Yogini असेच करतात. मात्र माझ्या वाचनात 'अप्सरा...वनदेवता...जलदेवता....' यांच्या संदर्भात जे काही समोर आले होते, तिथे तिथे 'योगीनी' असेच दिसले असल्याने वरील प्रतिसादातही मग मी 'योगीनी' हाच पर्याय स्वीकारला आहे.

असो....मी शुद्धलेखनाच्याबाबतीत काहीसा हळवा असल्याने लिखाणशुद्धतेच्या गोष्टी आवर्जून पाळतो....पण काही वेळा पारंपारिक लिखाणही स्वीकारावे लागते, इतकेच.

अशोक पाटील

अशोक. | 18 November, 2012 - 00:12
कथेची नोंद घेतल्याबद्दल................ असो....मी शुद्धलेखनाच्याबाबतीत काहीसा हळवा ............पारंपारिक लिखाणही...........

"पारंरिक" असे हवे का ?

अश्वत्त्थाम्याने अस्त्र सोडले तेंव्हा कृष्णाने त्याला मागे घ्यायला सांगितले. पण अश्वत्थाम्याला कोणतेही अस्त्र सोडणे जमत होते, ते मागे घेण्याची विद्या त्याला अवगत नव्हती... त्यामुळे ते अस्त्र त्याने गर्भावर सोडून दिले.. कारण कुणी ना कुणी आता मरणे आवश्यकच होते..

आधी अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र चालवले.. मग अर्जुनाने ब्रह्मास्त्र चालवले. त्यात व्यासमुनी मध्ये पडले. त्यानी दोघाना अस्त्रे मागे घ्यायला लावली . पण अर्जुनाला ते जमले.
अश्वत्थामा म्हणला: मुझे शस्त्र वापस लेना नहीं आता. मै इसकी दिशा बदल दूंगा लेकिन वो जायेगा पांडवों की ओर.

http://www.youtube.com/watch?v=Wi0dWShd_DU ००.३५ मिनिटाच्या पुढचे पहावे.

अश्वत्त्मामा ब्रह्मास्त्र हाताने फेकतो.. आणि अर्जुन मात्र तेच ब्रह्मास्त्र धनुष्याला लावून उडवतो! Proud

पण कृष्णाने लीला दाखवली...

नारायणस्त्राचा प्रयोग वेगळ्या प्रसंगातील आहे.

http://www.youtube.com/watch?v=gQO5QrVG_eE

यु ट्य्बात म्होप वांगी पडलेत.. हुडका तिथं . सापडत्यात! Proud

पाटील सर,
त्या कात्रेंनी केलेली टायपिंग मिष्टेक तुम्ही सिरियसली घेतलीत, अन आता हित्ली लोकं तुमचं सुद्दलेकन तपासायला लागलेत.

हो आसा !
बळीराजावर अन्याय तर झालाच!
बळीराजा प्रल्हादाचा मुलगा होता
प्रल्हाद पण असुरकुळातला, फिर उसकेसाथ कायको ऐसा नै हुवा होयगा? Uhoh

बळीराजा प्रल्हादाचा नातू .. प्रल्हादाचा मुलगा विरोचन (?) , त्याचा मुलगा बळी.

प्रल्हाद हा 'त्यांच्या' कंपूमधला आय डी होता. म्हणून वाचला. हिरण्यकशपू, बळी हे सगळे विरोधी कंपूतील होते . म्हणून ते उडाले. . अध्यात्मिक कंपूबाजी ... Proud

@ अविनाश१ ~ धन्यवाद.....पारंपरिक असेच हवे.....आत्ताच शासकीय शब्दकोशही त्यासाठी मुद्दाम पाहिला. इथल्या देवाणघेवाणीचा असाही एक फायदाच म्हणायचा.

@ डॉक्टर ~ पण मला हे आवडते. मी काही भाषाप्रभू वा व्याकरणपंडितही नसल्याने कुणी अशा चुका {जरी त्या किरकोळ मानल्या गेल्या तरी....} दाखविल्या तर... आय मस्ट वेलकम दॅट पीस ऑफ सजेशन.

चमन, धन्यवाद.

आंबा१, कृपया विनाकारण टिंगल करू नका, "वांगी" वगैरे भाषा इथे वापरू नका. माहिती असेल ते स्पष्ट लिहा, इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या. धन्यवाद.

समुद्रातून सापडलेली चौदा रत्ने कोणती आणि ती नक्की कशाप्रकारे वाटली गेली? - ही रत्ने आधीपासून माहित होती का? म्हणजे लक्ष्मी हे रत्न सापडलं त्याआधी विष्णूंची पत्नी कोण म्हणायचं? की महादेवमधे दाखवलं तसं लक्ष्मी समुद्रात गेली होती तिला परत बाहेर काढण्यात आलं?

नंदिनी,
तुम्ही टीव्ही सिरियल्स लैच सिरियसली घेताय ब्वा!
त्यात दाखवतात तसले कपडे घालून देव सोडा, लोक तरी फिरत असतील का कधी असा प्रश्न पडल्याशिवाय रहावत नाही.

तुम्ही टीव्ही सिरियल्स लैच सिरियसली घेताय ब्वा!
>>नाही, पण काल सीरीयल बघत अस्ताना मनात पडलेले प्रश्न आहेत. हा बीबी चालू करायलादेखील संथ चालती ह्या मालिका बीबीवरच्याच चर्चेचा संदर्भ होता.

Pages