पुराणातील कथा

Submitted by नंदिनी on 16 November, 2012 - 06:21

इथे तुम्हाला माहित असलेल्या वेगवेगळ्या रोचक पुराणकथा लिहा. हिंदू, बौद्ध, जैन, इस्लाम, ख्रिस्ती, ग्रीक, रोमन आणि इतर धर्मांतील व देशांतील कथा माहित असतील तर इथे लिहा. हा बाफ अशा कथांच्या संकलनाकरता आहे. त्या कथांची सत्यासत्यता तपासण्यासाठी अथवा वैज्ञानिक कसोट्या लावण्यासाठी नाही.

इथे टिंगलटवाळी करणारे, एखाद्या धर्माला उद्देशून चेष्टा-मस्करी करणारे लिखाण करू नये ही विनंती.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनार्य परंपरेंवर स्थापन केलेलं वर्चस्व (रावणाला हरवणं) अशा प्रकारेही त्याचा अर्थ लावता येतो.

रावण अनार्य नव्हता. रावण आर्य- ब्राह्मण वर्णातील होता. राम रावण युद्ध हे दोन आर्यांमधीलच युद्ध होते. त्यात अनार्यांचा संबंध येत नाही.

आणि रामानं कुठली अनार्य परंपरा संपवली? शिवलिंगाची पूजा ही अनार्य परंपरा ना हो? स्वतः रामानं रामेश्वरमला शिवलिंग नाही का पूजलं? मग तो राम अनार्य परंपरा कशाला संपवेल? वाली अनार्य होता, तिथेसुग्रीव बसला. रावण आर्य होता, तिथे बिभीष्हण - तोही आर्यच, बसला. आणि राम पुन्हा परत आला... व्हेअर ईज आर्य अनार्य घनघोर संग्राम?? राम रावण दोन्ही आर्य पार्टीच होत्या!

-- नंदिनीबाईचे सर्टिफिकेट नसले तरीही स्वतःला अभ्यासूतच गणणारा आंबामुनी

हेय!
नो.
आज कोण संपादनास बसले आहे ठाऊक नाही.
नॉट फेअर. अगदी माबो तुमच्या मालकीची आहे हे ठाऊक आहे, तरीही नॉट फेअर.

नंदिनी | 21 November, 2012 - 20:29

पोपटात जीव असलेल्या जादूगाराच्या गोष्टीत जसे फक्त आणि फक्त रंजनमूल्य शोधायचे असते, तसेच पुराणांचे आहे. त्यात अजिब्बात प्रतिकं फितिकं शोधू नयेत. इतिहास अन रुपके तर नाहीच. कारण प्रतिके/रुपके दोन्ही बाजूंनी शोधता येतात. इतिहास म्हणावं तर टाईमलाईन मार खाते.>>>

इब्लिसजी, वरदाचा या विषयामधे अभ्यास तुमच्यापेक्षा निश्चितच जास्त आहे. आपल्यासारख्या सर्वसामान्यांसाठी या कथा रंजनमूल्यासाठी आहेत. त्यांच्यासारख्या अभ्यासकांना कदाचित टाईम मशिनसारख्या आहेत. या पुराणांमधले काय घेऊन कशी संगती लावायची याचाच तर ते अभ्यास करत असतात ना? त्यांना त्यांचा अभ्यास करू द्यावा. आपण रंजनमूल्य शोधावे. धन्यवाद.

वरदा, अशोकसर (आणि केदार, अजून कुणाचा अभ्यास असेल त्यांना माझी विनंती) कृपया इथे जमेल तशी माहिती देत रहा.

***

या प्रतिसादाचे उत्तर उडविल्याबद्दल निषेध.

@इब्लिस
आर्य हे वैदिक काळात खिल्लारं घेऊन रहाणारे अर्धभटके (सेमिनोमॅडिक) लोकसमूह असावेत असं दिसतं. तत्कालीन वैदिक देवतांमधील सर्वात प्रमुख देवता म्हणजे इंद्र. हा एक वीरदेव (हीरो गॉड) आहे असं त्याच्या वर्णनांवरून दिसतं. तो पुरंधर म्हणजे नगरांचा नाश करणारा असंही त्याचं एक विशेषण आहे. उत्तर वैदिक काळापासून, म्हणजे सुमारे ८०० इसपू पासून वैदिक समूह स्थायी झाले असं दिसून येतं. त्यांच्या वैदिक वसाहती आता गंगा-सदानीरा (आजचं बिहार) पर्यंत पसरलेल्या दिसतात. यज्ञसंस्था पक्की झाली तसं देवतांची महत्वश्रेणी बदलली. इंद्रापेक्षा प्रजापति महत्वाचा ठरला. पण इंद्र वेदात इतका महत्वाचा होता की नंतर सुमारे दोनहजार वर्षांनंतर ग्रथित झालेल्या पुराणपरंपरेच्या दैवतमंडलातही तो देवांचा राजा म्हणूनच गणला गेला असं अभ्यासकांचं मत आहे (कल्चरल मेमरी).

बळी, वामनावतार वगैरे गोष्टी खूपच नंतरच्या आहेत. मुळात आज आपण दशावतार ज्या रूपात पहातो ते फारतर हजारदीडएक वर्षं जुने आहेत. त्यातल्या बहुतेक देवता स्वतंत्रपणे पूजल्या जात होत्या पण अवतारसंकल्पनेतलं त्यांचं संकलन बरंच नंतरचं आहे. तेव्हा वामन आधी मग राम याला इतिहासाच्या दृष्टीने अर्थ नाही.
आर्यांनी उत्तर प्रदेश, गंगेच्या खोर्‍यात वसती केल्यानंतर रामायण लिहिलं गेलं हे सरळ आहे (शरयू नदी, इ.) आणि महाभारत आधीचं (त्यातले भौगोलिक संदर्भ सगळे पंजाब-हरियाणा-दिल्लीचे आहेत). सुर-असुर, देव-दानव या कल्पना अनेको शतकं चालत आल्या आहेत. आणि वैदिक परंपरेच्या बाहेरच्यांनाही सर्रास असुर, राक्षस (जसं रामायणात) म्हणलं जाई. रावणाचे वडील जरी ब्राह्मण असले तरी आई राक्षसी होती, बहीणही राक्षसीच होती. तेव्हा रावण हा अवैदिक परंपरेचा प्रतिनिधी आहे. शिवाय त्याचे राक्षस ऋषींचे यज्ञ उद्ध्वस्त करत.

रामाने शिवलिंगाची पूजा केली हा संदर्भ रामायणात घातला जाईपर्यंत शिव हा सनातन-पौराणिक परंपरेतला एक महत्वाचा देव बनलेला होता. शिवाय विष्णूचा अवतार असलेल्या रामाने किंवा रावणाने शिवाची पूजा करणे या कथेमागे शैव श्रेष्ठत्व दाखवण्याचाही हेतू असू शकतो आणि रामायणाच्या प्रत्येक व्हर्जनमधे ती कथा असेलच असं नाही. (रामकथा किंवा महाभारतातल्या अनेक पात्रांच्या एकदम हटके कथा जैन बौद्ध परंपरांमधेही येतात. कारण या लोकमानसाला अतिपरिचित असलेल्या प्राचीन कथा किंवा प्राचीन पात्रे आहेत. आणि प्रत्येक धार्मिक परंपरेने आपापले रंग देऊन त्यांच्या कथा सांगितल्या असणार. शिवाय एकमेकांवर कुरघोडी, त्या त्या पात्रांना बदनाम करायचा प्रयत्न असाही काहीसा हेतू असू शकतो)

<<वात्रटपणे, बेजबाबदारपणे, नीचपणे वागने पुरुषांना अलाऊड होते असे म्हणायचे का मग?..>> असं टोकाला जाऊन विधान करायची गरज नाही. कुठल्याही पुरुषप्रधान प्राचीन समाजात धर्म हा समाजचालन करणारा असतो. त्याचे नियम हे धर्मग्रंथात जसे असतात (स्मृती) तसंच विविध कथा, मिथकं यांच्याद्वारेही या सामाजिक चौकटी समाजमनावर वारंवार ठसवल्या जात असतात. आणि अशा समाजात पुरुषांपेक्षा स्त्रियांवर जास्त बंधनं असणार, त्यांची वागणूक ही अगदी चाकोरीबद्ध असली पाहिजे असं ठरवलं जाणं हे स्वाभाविकच आहे. पुरुष थोडा इकडेतिकडे वागला तरी कमी प्रायश्चित्ताने त्याची सुटका होणार. त्या दोघांना, किंवा समाजातल्या वेगवेगळ्या सामाजिक गटांना, सारखा न्याय कधीच नव्हता.

पुराणांच्या विश्लेषणाने काय मिळते हा प्रश्न आपण पुराणांच्या आणि इतिहासाच्या अभ्यासकांवर सोडूयात. जे त्यात गंभीरपणे काम करतात ते इथे वादाची रंगणं खेळायला किंवा पुराणांचं महत्व पटवायला येत नाहीतच. ते काम करतात आणि प्रसिद्ध करतात. ज्यांना वाचायचंय त्यांनी अवश्य वाचावं Happy

रच्याकने, आंबा२ - तुम्हाला नंदिनीने माझा या विषयावर अभ्यास आहे असं म्हटलेलं का लागलं बरं इतकं?

मस्त लिहिलयस वरदा.

रामकथा किंवा महाभारतातल्या अनेक पात्रांच्या एकदम हटके कथा जैन बौद्ध परंपरांमधेही येतात. >> अगदी गणपतीच्या सुद्धा कथा जैन परंपरेमधे वेगळ्या येतात, त्याला मुख्यत्वेकरुन कुबेराचे स्थान दिलेले आहे.

पुराणातील काही ठराविक व्यक्तीरेखांबद्दल एक ढोबळ आराखडा कायम दिसून येतो..

जन्म... जन्मानंतर त्यांच्यावर विविध राक्षसांचे हल्ले, त्यांच्या हातून कोणाची तरी आधीच्या शापातून मुक्तता, कोणत्या तरी मोठ्या राक्षसाचा मृत्यू... नंतर अजून कोणाला तरी मदत.. राम, कृष्ण, गणपती ह्यांच्या बाबतीत तर नक्कीच असा क्रम दिसतो.

पुराणात फक्त कथाच आहेत असा मत प्रवाह येथे दिसतो आहे. परंतु तसे नाही. उदा. वायू पुराणात संगीत विषयक माहिती येते. श्रुती, त्यांचे प्रकार. गायन कसे करावे याबद्दल, मार्ग दर्शन. वाद्ये आणि त्यांचे प्रकार इत्यादी माहिती यात आहे. तसेच भविष्य पुराणात

  • विश्वाची उत्पत्ती
  • सूर्योपासना, त्याचे महत्व
  • विवाह विधी कसा होतो,
  • गृहिणीने घर कसे चालवावे,

घरासाठी लागणार्‍या वस्तूंची यादी अशी अनेक प्रकारची माहिती आहे.
या शिवाय यज्ञ कसे करावेत. यज्ञाला लागणार्‍या वस्तूंची यादी वगैरे सर्व माहिती आहे.

या कारणांमुळे पुराणांचे महत्त्व वाटते. कारण यातून प्राचीन समाज जीवन कसे होते याचे दर्शनही घडते.

वरिल चर्चा वाचली. छान चर्चा चालू आहे तरिही.
प्रबोधनकार ठाकरे यांनी त्यांच्या देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे या पुस्तकात लिहलेला "पुराणा" संबधी काही भाग
***************************************
देवळांचे माहात्म्य पुराणांनीं वाढविले `पुराणें म्हणजे शिमगा’ असे पुष्कळ विचारवंतांचे म्हणणें आहे. पुराणे म्हणजे शौचकूप, असे आमचे मत आहे. पुराणांत कांहीं गोष्टी चांगल्या आहेंत, असें काही भेदरट सुधारकहि म्हणतात. असतील शौचकूपांत पडलेल्या मोहरा. पुतळ्या ज्यांना उचलायच्या असतील त्यांनी खुशाल उचलाव्या. आम्ही त्यांचा हात धरूं इच्छित नाहीं. पुराणें म्हणजे शौचकूप ठरल्यावर त्यांच्या जिवावर जगणा-या देवळांत काय काय पातकांच्या गिरण्या सुरूं असतात. याची कल्पनाच केलेली बरी. देवळें म्हणजे भिक्षुकशाहीच्या जन्मसिद्ध वतनी जहागि-या. देवळाशिवाय भट नाहीं आणि भटाशिवाय देऊळ नाही. असा एक सनातनी नियमच ठरून गेला. ह्यामुळें पुराणप्रसव्या भटांनीं देवळांचीं संख्या भरंसाट वाढविण्यासाठी देवांचीहि देवसंख्या वाढवीत वाढवीत ३३ कोटींवर नेऊन भिडविली. त्यात पुन्हा देवांमध्येहि श्रेष्ठ कनिष्ठपणाच्या जाती उत्पन्न केल्या. विष्णुपुराणात विष्णु श्रेष्ठ, बाकी देव लुच्चे. गणेशपुराणांत गणोबा श्रेष्ठ, बाकी देव कुचकामी.
******************

@ आबासाहेब :

सांप्रत काळात "झारीतले शुक्राचार्य" या वाक्यप्रचाराला वेगळ्या वा विरुद्ध अर्थाची छ्टा प्राप्त झाल्याचे आपल्याला दिसून येते. उदाहरणार्थ ~ समजा मराठवाडा विकास प्रकल्पातील जायकवाडी धरणात साठणार्‍या पाण्याबाबत वाद निर्माण झाला तर तो निर्माण करणारी व्यक्ती म्हणजे त्या भागाच्या विकासाला अडथळा आणणारी व्यक्ती म्हणजेच 'झारीतील शुक्राचार्य' ठरते. प्रसार माध्यमानीही परवापरवा अरविंद केजरीवाल आणि प्रशांत भूषण यांची अण्णांच्या प्रवासातील 'झारीतील शुक्राचार्य' अशी संभावना केल्याचे दिसले.

प्रत्यक्षात शुक्राचार्यांनी एका चांगल्या हेतूसाठी 'त्या' झारीत प्रवेश केला होता. ती कथा थोडक्यात अशी सांगता येईल ~~

विष्णूच्या वामनावताराची जी कथा आहे त्यामध्ये असे कथानक आहे की, असुरांचा राजा बली आपल्या तपोबलाने सामर्थ्यशाली झाल्यामुळे देव घाबरले. नित्यनेमाने देवांच्या रक्षणासाठी विष्णूने वामनाचा अवतार घेऊन बळीराजाला नष्ट करण्याचे ठरविले. बळीराजा दानशूर होता. वामनाने त्याच्याकडे तीन पावले भूमी दान म्हणून मागितली. तीन पावलांत सारे ब्रह्मांड व्यापून बळीला पाताळात लोटण्याचा त्याचा [म्हणजेच विष्णूचा हेतू होता.] ऋषी शुक्राचार्य हे असुरांचे गुरू होते. वामनाच्या रुपात आलेल्या विष्णूचे कपट त्यांनी ओळखले. दानाचा प्रघात असा असतो की ते करताना झारीतून अर्घ्य सोडावे लागते. त्याशिवाय दानाची प्रक्रिया पूर्ण झाली असे मानत नाहेत. बळीने तर दान करायचेच असा निश्चय केल्याने मग शुक्राचार्य ते दान अपुरे राहावे म्हणून सूक्ष्म रुप घेऊन झारीत जाऊन बसले आणि झारीतून अर्घ्य खाली पडणारच नाही, अशी चोख व्यवस्था त्यांनी केली. पण अर्थातच विष्णूच्या म्हणजेच चतुर वामनाच्या लक्षात येताच त्याने बळी त्याच्या हातावर उदक सोडीत असतानाच युक्तीने झारीत शिरलेल्या शुक्राचार्यांचा डोळा दर्भाने फोडला. वेदनेने कळवलेले शुक्राचार्य झारीतूनच त्या पाण्याच्या ओघासमवेत बाहेर फेकले गेले आणि मग बळीने द्यायवाच्या दानाची प्रक्रिया पूर्ण झाली.

प्रत्यक्षात ज्याचे मीठ आपण खात आहोत त्या असुरांच्या साम्राज्याचा तसेच सम्राटाचा नाश होऊ नये म्हणून प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून शुक्राचार्य त्या झारीत जाऊन बसले, याचाच अर्थ असा होतो की शुक्राचार्यांचा हेतू [त्यांच्या भूमिकेतून पाहिल्यास] चांगल्या कामात अडथळे निर्माण करण्याचा नसून आपल्या शिष्याच्या हिताचे रक्षण करण्याचा होता. त्यात त्यांचा वैयक्तिक स्वार्थ नव्हता.

पण कालौघात 'झारीतील शुक्राचार्य' म्हणजे चांगल्या कामात अडथळे आणणारी व्यक्ती असाच अर्थ पसरला आणि तोच आजही कायम आहे.

अशोक पाटील

झकासराव.....

"पुराणकथा" ~ विविध घटनांचे वर्णन म्हणजे फक्त देव आणि दैत्य यांची 'तू श्रेष्ठ की मी श्रेष्ठ', "मी चांगला अन् तू वाईट...' याबद्दलची भांडणे नसून ते जीवनाविषयीचेही तत्त्वज्ञान सांगत असते. म्हणजे "घेतला वसा....उतू नको मातू नको....". मिळाला देवाचा वर तसेच आशीर्वाद....तर त्याचा सदुपयोग करावा.....मिळालेल्या शक्तीमुळे उन्मत्त होऊ नये...न्यायप्रिय व्हावे.....आदी अनेक शिकवणी त्यातून मिळत असतात.

बळीची कथा, त्याचा उदय, उत्कर्ष, सामर्थ्य हे तर अतुल होतेच, सद्गुणी होता, प्रजाहितदक्ष होता, पण म्हणून तो सर्वार्थाने चांगलाच होता असेही पुराण सांगत नाही. स्वर्गावर रोहण करून त्याने इन्द्राला तिथून हुसकविले होते आणि स्वर्गलोकीच्या संपत्तीचे हरण केले तसेच इन्द्रपदीही तो आरुढ झाला होता. ती संपत्ती समुद्रस्वाहा झाली मग ती परत मिळविण्यासाठी ते प्रसिद्ध असे 'समुद्रमंथन' ही करावे लागले.....ती कथा वेगळीच आहे.

त्यावेळी झालेल्या युद्धात मृत झालेल्या बळीला त्याचे गुरू शुक्राचार्य यानीच अमृत देवून पुन्हा जीवित केले होते. पण पुढे याच शुक्राचार्यांचा त्याने सल्ला मानला नाही. त्यांचा शापही त्याला भोवलाच. आपल्या सामर्थ्याबाबत त्याने बढाईखोरपणा केल्याचे उल्लेख आहेत. बळीचे साम्राज्य त्रैलोक्यात पसरून मग देवतांचा नाश होईल या भीतीनेच त्याच्यात असलेल्या सदगुणांचा लाभ घेऊन विष्णूकरवी त्याचा नाश होईल अशीच योजना आखली गेली....तीच मग 'वामनावतार' कथा.

असे असले तरी पृथ्वीवरील सामान्य जनतेच्या मनी बळीविषयी आजही आदराचीच भावना दिसून येते. बलीप्रतिपदेदिवशी त्याची पूजा करताना 'ईडापिडा टळो, बळीचे राज्य येवो..." अशी भाकणूक करण्यामागे उद्देश्य हाच आहे की, राजा असावा तर बळीसारखा. म्हणजेच तो वाईट नव्हता हे सर्वसामान्याना वाटते, पण 'वर' बसलेल्या इन्द्रादी देवदेवताना 'तितका चांगला' वाटत नव्हता असेच पुराण सांगते.

अशोक पाटील

अशोक.,

>> राजा असावा तर बळीसारखा. म्हणजेच तो वाईट नव्हता हे सर्वसामान्याना वाटते, पण 'वर' बसलेल्या
>> इन्द्रादी देवदेवताना 'तितका चांगला' वाटत नव्हता असेच पुराण सांगते.

अगदी अगदी! हा नीरक्षीरविवेक काही लोकांच्या लक्षात येत नाही. मग पुराणे म्हणजे अमुक आणि पुराणे म्हणजे तमुक इत्यादि ठोकळेबाज विधाने सुरू होतात.

आ.न.,
-गा.पै.

पाटिल गुरुजी,
पुराणांतून रंजनाव्यतिरिक्त काय घ्यावे त्याबद्दलचे प्रबोधनकारांचे कॉपीपेस्ट मुंबईकर यांनी वर दिले आहेच.
*
आपल्या सामर्थ्याबद्दलचा बढाईखोरपणा कुणी कुणी व कितीकिती केलेला आहे, ते उदाहरणादाखल नुसती गीता ओझरती वाचली तरी दिसते. Wink तेव्हा बढाईखोरपणा हा अवगुण नसावा.

स्वर्ग जिंकून घेतला होता. कपटाने नाही. युद्ध जिंकून शत्रूचा प्रदेश काबिज करणे व त्याची संपत्ती लुटून नेणे यात क्षत्रियांच्या धर्माविरुद्ध काही होते असेही नसावे.

नंतर तुम्हीच लिहिलेले हे वाक्य पहा.
>>बळीचे साम्राज्य त्रैलोक्यात पसरून मग देवतांचा नाश होईल या भीतीनेच त्याच्यात असलेल्या सदगुणांचा लाभ घेऊन विष्णूकरवी त्याचा नाश होईल अशीच योजना आखली गेली....तीच मग 'वामनावतार' कथा.<<

एकाद्याच्या चांगुलपणाचा लाभ घेऊन, कपटाने त्याचे तळपट होईल अशी व्यवस्था करणे, हेच पुराणांतून घ्यावयाचे आहे काय?

त्यामुळे तुम्हीतरी कथा सोडून त्याबद्दल >>"ते जीवनाविषयीचेही तत्त्वज्ञान सांगत असते."<< अशी वाक्ये लिहू नयेत असे वाटते, कारण मग त्याला उत्तर लिहिल्याशिवाय रहावत नाही.

रच्याकने : इथल्या संपादकांना पुराणांतून हे असे निष्कर्ष काढलेले चालत नाहीत बहुतेक. त्यामुळे ही पोस्ट उडेल, मग नंतर तिथे 'सामोपचार' इ. डूआयडी येऊन माझी 'खोडसाळ पोस्ट' उडवल्याबद्दल संपादकांचे अभिनंदन करतील, असे भाकित वर्तवतो. Wink

अशोकमामा धन्यवाद.
झकासने विचारलेली शंका मीही याच धाग्यावर विचारली होती. रियाने उत्तरही दिले होते.
पुन्हा एकदा धन्यवाद.

इब्लिस,

>> स्वर्ग जिंकून घेतला होता. कपटाने नाही. युद्ध जिंकून शत्रूचा प्रदेश काबिज करणे व त्याची संपत्ती लुटून नेणे
>> यात क्षत्रियांच्या धर्माविरुद्ध काही होते असेही नसावे.

स्वर्ग जिंकून घेतला तरी देवांचा अधिकार काढून घेता येत नाही. बळीने तसं केलं असेल असं म्हणत नाही मी. परंतु देवांच्या मनी शंका येणारच.

प्रजापतीने आखून दिलेल्या मर्यादेत देव, दानव आणि मानवांनी राहावे असा संकेत आहे.

आ.न.,
-गा.पै.

स्वर्ग जिंकून घेतला तरी देवांचा अधिकार काढून घेता येत नाही<<

हे कशावरून? कसला अधिकार? प्रत्येक इंद्र जुन्या इंद्राला हाकलून सत्तेवर बसत होता.

उदा. तुम्ही पाकिस्ताण जिंकून घेतला तर मुसलमानांचा त्यावरील अधिकार काढून घेता येणार नाही, असे काही पुराणोक्त आहे का?

कैच्याकै बोलू नका Lol

इब्लिस,

नवा इंद्र पण देव असतो ना!

माझ्या माहितीप्रमाणे प्रजापतीने (=ब्रह्मदेवाने) देवांना, दानवांना आणि मानवांना उपदेश केला होता. त्या मर्यादा सांभाळणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. हा माझा अंदाज आहे बरंका. नक्की माहीती नाही. कोणी प्रकाश टाकल्यास उत्तम.

आ.न.,
-गा.पै.

डॉक्टर....

गा.पै. यानी केलेला 'प्रजापति' हा उल्लेख बरोबर आहे. प्रजापति हे सर्वश्रेष्ठ देवाचे नाव बनले. इथे 'पती' ह्या नामाचा अर्थ 'विश्वाला आधार देणारा'....म्हणजेच प्रजा = विश्व या अर्थाने 'प्रजापति' हे विशेषनाम. [ "दिवो धर्ता भुवनस्य प्रजापति:" असा ऋग्वेदात उल्लेख दिसून येतो]. वेदात काही ठिकाणी प्रजापतिकडे 'संतती मिळावी' अशी प्रार्थना केल्याचे आढळते. एका सूक्तेच्या ऋचेत प्रजापतिला असेही आवाहन दिसते की, "हे प्रजापति, या सृष्टीचा स्वामी दुसरा कोणी नसून तूच आहेस. ज्या इच्छा बाळगून आम्ही तुझे आवाहन केले आहे त्या पूर्ण होवोत.'

वाचस्पति = वाणीचा स्वामी,
बृहस्पति = विद्या,
अरमति = भक्ती, निष्ठा,
अनुमति = कृपा, निऋति = अंत,
असुनीति = चैतन्य,
वास्तोष्पति = गृहस्वामी
.... इत्यादी, अशी काही 'पती' रुपे आपणास पुराण वाचनात आढळून येतात.

अशोक पाटील

सर,
सगळी प्रजा उत्पन्न करणारा तो प्रजापिता ब्रह्मा असं काही तरी ऐकल्यासारखे वाटते आहे.
अन हे माऊंट अबूवाले प्रजापिता ब्रह्माकुमारी काय प्रकरण आहे मग?

Pages