राशींनुसार व्यक्तिमत्त्वाचे नमुने

Submitted by निंबुडा on 15 February, 2012 - 05:34

खूप लहान असताना श्री. शरद उपाध्ये यांचा "राशीभविष्य" (की "राशीरंजन") हा कार्यक्रम पाहिला होता. त्यात प्रत्येक राशीच्या लोकांचे स्वभावविशेष विनोदी ढंगात (बर्‍याचदा अतिशयोक्तीपूर्ण प्रसंगांचा आधार घेऊन) सादर केलेले होते. त्यातला विनोदनिर्मिती साठी वापरलेल्या अतिशयोक्तीपूर्ण प्रसंगांचा भाग सोडून द्या! पण राशींचा जो बेसिक स्वभाव असतो तो त्या त्या राशींच्या सर्व लोकांना तितक्याच प्रमाणात अप्लिकेबल असतो का?? मला तरी तसे वाटत नाही. कारण मग जगात फक्त १२ राशींप्रमाणे १२ प्रकारचेच स्वभाव असलेली माणसे असली असती. म्हणजे जगातल्या सर्व लोकांना फक्त १२च कॅटेगरीत विभागता आले असते. म्हणजेच अमुक एक जण अमुक राशीचा म्हणून त्या त्या राशीसाठी प्रसिद्ध असलेले सर्व स्वभाव विशेष त्यात असतीलच असे नाही.
उदा. कर्क - या राशीची माणसे प्रेमळ स्वभावाची असतात. स्वयंपाकघरात रमणारी असतात. (पुरुष असले तरीही).
सिंह - खमकी लोकं असतात.
कन्या - संशयी स्वभाव. आत्मविश्वासाचा अभाव.
तूळ - बॅलन्स्ड व्यक्तिमत्त्व
इ.इ.
राशीप्रमाणे तुमचा स्वतःचा आणि जवळच्या लोकांचा तुमचा काय अनुभव आहे? प्रत्येक वेळी राशीवरून व्यक्तीचा बेसिक स्वभाव (संपूर्ण स्वभाव नाही) जज करता येतो का?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>मला घरात रमायला आवडतं, स्वयंपाक करायला आवडतो असं म्हणलं की लोक मला हसतात.
हा बघ घरातला सिंह Proud

a_sinha.JPG

अन तरीही कुठे कुठे एकेकट्याने जाऊन विनाकारणच फोडलेल्या "वैचारिक डरकाळ्या/गुरगुर" >> तुफान हसलोय Lol
थोडक्यात काय तर, नांगीत तराजू पडून मधेमधे डरकाळ्या फोडणारा विंचू अशी माझी रास असावी Proud
धन्यवाद, लिंबूदा!
आगाऊ, वृषभ किंवा मिथुन>>> बघा अजून दोन, म्हंजे ५/१२, प्रॉबॅबिलिटी कमी होत चालली आहे!!! (हा तुमच्या डोक्याला ताप देण्याचा प्रयत्न नाहीए, खरचं दिनेशदा Wink

मी कुंभ.......

घडलेला की बिघडलेला तुम्हीच ठरवा.....

मी मंदीरात जात नाही...... पण गणपतीचे 10 दिवस घरातल्या गणपतीचे आव्रजून करतो....
बाकी वर्षभर देव आणि मी "तू कोण, मी कोण." Happy

हसरी, आपली भेट झालीय की !

मंदार मला मेष वाटला. म्हणजे बेधडक काहीतरी करुन टाकायचे, परीणाम काय होतील त्याची चिंताच नसते. थोडक्यात आ बैल मुझे मार. (अगदी त्याच्याचसारखा दिसणारा माझा एक मित्र तसाच आहे.)

लिंबू, म्हणजे ज्ञानी, मेहनती, कलाकार माणूस. पण बोलण्यात बेफिकीर !!!

बेसिकली वृषभेच्या लोकान्ना शक्यतो "सुरक्षित व आखिवरेखिव" वातावरणात रहायला आवडते, चाकोरीबाहेरील उपक्रम केलेच तरीही ते "सुरक्षितरित्या" करण्याकडे कल असतो, जुगारी वृत्ती नसते. पण ही लोक कष्टाळूही तितकीच असतात, मनात घेतलेल्या गोष्टीवर अखण्ड परिश्रम करण्याची यांची तयारी असते. शुक्राची रास असूनहि तुळेचे मात्र तसे नसते.
शुक्राची रास असल्याने अन अर्थातच, टापटीप/छान रहाणे, हे यान्ना चांगले सहजगत्या जमते. अन्गावर घालायला किती/काय आहे हे महत्वाचे नसुन, ते कशाप्रकारे कोणत्या प्रसन्गात किती व्यवस्थितपणे घातले/वापरले गेले तरच चान्गले उठून दिलेल याचे ज्ञान यान्ना उपजत असते. त्यामुळे गरिबातील गरीब वृषभ व्यक्तीही, त्याच्या सुयोग्य पेहरावामुळे, श्रीमन्तातील श्रीमन्त वृषभ व्यक्तीइतकीच शम्भरजणात वेगळी उठुन दिसते.
मात्र, नॉर्मली, वृषभ रास व खास करुन रोहीणी नक्षत्राच्या व्यक्ति या बरेचदा एकतर "एकला चलोरे" वा "आत्मभानात" मश्गुल अशा असू शकतात. ठराविक चौकटी बाहेरच्या बाबीन्ची दखल घेणे/आत्मसात करणे यान्ना जमतेच असे नाही. किम्बहुना, अशा बाह्य बाबीन्ची वास्तपुस्त राहुदेच, त्यान्चे अस्तित्वही यान्चे गावी नसते.
पण एकन्दरीत पहाता, या व्यक्ती इतरान्करता तशा "निरुपद्रवीच" असतात असे माझे मत. Happy

स्तुतीप्रियता बाराही राशीन्मधे आढळून येते, पण प्रत्येकीची तर्‍हा वेगवेगळि असते.
सिंह राशीला त्यान्चे पराक्रमाची स्तुती आवडेल्, तर वृषभेला त्यान्चेतील कलागुणान्ची/बाह्यप्रकटनाची/वस्तुसन्ग्रहाची स्तुती आवडेल.

>>> बाय द वे हे चंद्ररास/सूर्यरास/लग्नरास काय भानगड आहे?

चंद्ररास म्हणजे जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत असतो ती रास.

लग्नरास म्हणजे जन्माच्या वेळी पूर्व क्षितिजावर जी रास असते ती रास.

वृषभ रास व खास करुन रोहीणी नक्षत्राच्या व्यक्ति या बरेचदा एकतर "एकला चलोरे" वा "आत्मभानात" मश्गुल अशा असू शकतात. ठराविक चौकटी बाहेरच्या बाबीन्ची दखल घेणे/आत्मसात करणे यान्ना जमतेच असे नाही. किम्बहुना, अशा बाह्य बाबीन्ची वास्तपुस्त राहुदेच, त्यान्चे अस्तित्वही यान्चे गावी नसते.>>>>>>>>>>> हे माहितच नव्हतं मला.................

माझा भाऊ आणि वहीनी, दोघेही वृषभेचे. त्यांच्याबाबतीत हे खरे आहे.

सारिका च्या पाऊलखुणा बघाव्या लागतील.

>>मंदार मला मेष वाटला. म्हणजे बेधडक काहीतरी करुन टाकायचे, परीणाम काय होतील त्याची चिंताच नसते. थोडक्यात आ बैल मुझे मार. (अगदी त्याच्याचसारखा दिसणारा माझा एक मित्र तसाच आहे.)

दिनेशदा Happy Proud

फुल्ल चिरफाड चालू आहे Proud

लिखाणावरून ओळखणं अवघड आहे पण. नुसत्या राशीवर स्वभाव अवलंबून असतो असं मलाही वाटत नाही.

रच्याक, लिखाणावरून दिनेशदा कुंभ वाटले होते.

लिंबूटिंबू ___/\___ वृश्चिक बद्दलच्या पॅर्‍याबद्दल Happy

दिनेश दा मी सिंह.... तूळ नै कै....
जो गरजते हैं वो बरसते नही...
म्हणून मी गर्जत नाही... म्हंजे कधी गरज पडत नाही त्याची.. Proud

सारिका च्या पाऊलखुणा बघाव्या लागतील.
>>
हल्ली पाऊलखुणा बंद आहे ना? मला तरी दिसत नाहीयेत. Uhoh

लिंबुकाका,
वृषभेचे तुम्ही वर दिलेले सर्व गुण माझ्याबाबतीत अगदी तंतोतंत. Happy

+ हे अ‍ॅडिशन्सः
स्वतः समाधानी / आनंदी असले की दुसर्‍यांना आनंदी / समाधानी करण्याकडे कल आहे. स्वतः दु:खी / कष्टी रहायचे, त्याग वगैरे करायचा पण इतरांची सेवा करायची व इतरांना सुखी करायचे हे तत्त्वज्ञान फारसे पचनी पडत नाही.

स्वतः मध्ये मश्गुल राहणे खरंच आवडते. कितीही जवळची / आवडती व्यक्ती असली तर खास स्वतःचे असे काहीतरी राखीव स्वता:जवळच ठेवायला आवडते.

एकाच वेळी खूप सार्‍या गोष्टींचे व्यवधान ठेवणे जमत नाही. आवडतही नाही. एका वेळी हातात जे काम घेतले आहे ते मन लावून करायचे. उदा. इथे टाईप करतेय आणि त्याच वेळी बॉसशी फोनवर ऑफिसच्या कामासंदर्भात बोलतेय असं जमत नाही. असे करू गेल्यास कुठल्यातरी एका कामात गल्लत/ वेंधळेपणा हा ठरलेलाच! Uhoh

कलेचा/ सुंदर गोष्टींचा आस्वाद घेणे आवडते.

खूप उधळपट्टी नाही पण आवडेल ती वस्तु घेताना पैशाचा विचार करून त्या वेळचा आनंद नासवणे आवडत नाही.

सतत काहीतरी नवा उद्योग करायला हवा असतो. जुने जुने, तेच तेच , घीसे -पीटे, मोनोटोनस काम आवडत नाही.

कामाची मेथड ओर्गनाईज्ड आहे. कितीही जुने रेकॉर्ड्स / फाईल्स तारखेनिशी नीट अरेंज केलेले असतात. मॅनेजरने कितीही जुन्या कामाचे काही रेकॉर्ड्स मागितले तरी नीट शोधून (कमीत कमी वेळेत) देऊ शकते. घटनांचा, कामाचा ट्रॅक ओर्गनाईज्ड पद्धतीने ठेवलेले आवडते. सहसा यात कसूर होत नाही. व्यक्तिगत आणि घरगुती कामातही हाच रूल. पण खूप शिस्तप्रिय नाही.

चंद्ररास मीन + लग्नरास मेष + सूर्यरास सिंह........

चंद्ररास मीन + लग्नरास मेष ह्या कॉम्बोचे लोक पाहीलेत म्हणून लिहितेय.

मीनः गुरु चांगला असेल व पत्रीकेत एकटाच असेल( दुसरा ग्रह नसेल तर) तर गुरुसारखा स्वभाव. उगाच त्रास देणार नाहीत कुणाला, अंमळ गरीब, मदत करायची सवय, दिलेले काम करतात नीट.बुधाची साथ असली तर जरा विनोदी स्वभाव.
पण लग्नरास मेष मग परखड बोलणे. मनात असेल तर बोलून दाखवतात. सहसा चिडत नाहीत पण भडकले की समोरच्याला मस्त "समज" देतीलची जर त्याची चूक असेल तर. छोडेगा नही जी पद्धतीने.

मला कुंभ, तूळ,मकर लोक आवडतात कारण बर्‍यापैकी राशी आहे त्या.

मेष + वृष्चिक = मंगळ अधिपती
मीन + धनु = गुरु
वृषभ + तूळ = शुक्र
कुंभ + मकर = शनी
कन्या + मिथून = बुध
सिंह = रवी
कर्क = चंद्र

जेव्हा २ ग्रह एकमेकांपासून १२० अंश (म्हणजे एकमेकांपासून ५ व्या किंवा ९ व्या स्थानावर) असतात तेव्हा नवपंचम हा योग होतो. हा बहुतांशी शुभ असतो.

मास्तर, कर्क आणि मीन हा नवपंचम योग आहेका..? असल्यास तो अशुभ आहे असे ऐकले होते, त्याबद्दल लिहाल का.. Happy

>>> मास्तर, कर्क आणि मीन हा नवपंचम योग आहेका..? असल्यास तो अशुभ आहे असे ऐकले होते, त्याबद्दल लिहाल का..

नवपंचम योग हा राशींचा नसून ग्रहांचा असतो. तो मूळ जन्मपत्रिकेत असू शकतो किंवा वर्तमान ग्रहस्थितीत हा योग निर्माण होऊ शकतो. एकूण ७ योग असतात. युती (एकमेकांपासून ० अंश), ३० अंश, ६० अंश, केंद्रयोग म्हणजे ९० अंश, नवपंचम योग म्हणजे १२० अंश, षडाष्टक योग म्हणजे एकमेकांपासून १५० अंश व प्रतियुती म्हणजे एकमेकांपासून १८० अंश असे योग असतात. साधारणपणे केंद्रयोग, षडाष्टक योग व प्रतियुती अशुभ मानली जाते. युती शुभ किंवा अशुभ असू शकते. इतर योग साधारणपणे शुभ मानले जातात. पण ते सर्वस्वी पत्रिकेवर अवलंबून आहे.

सेहवाग व गांगुलीची वृषभ ही जन्मरास आहे. त्यांची बेधडक वृत्ती त्यांच्या राशीशी मिळतीजुळती आहे.

द्रविड मीन राशीचा आहे. त्याची सज्जन, पापभीरू वृत्ती ही मीनेचीच आहे. टीका होताच त्याने लगेच कर्णधारपद सोडले होते. हे देखील मीनेचेच लक्षण.

धोनी कन्या राशीचा म्हणजे सरळसोट वागणारा, छक्केपंजे नसणारा, अजिबात वादात न पडणारा.

सचिन धनु आहे. म्हणजे अभ्यासू, गंभीर स्वभाव आणि नेतृत्व गुणही आहेत.

माझी चंद्र रास आणि सुर्य रास कर्क आहे, नक्षत्र पुष्य..
मला स्वयंपाकघरात रमायला विशेष आवडत नाही, पण कधीतरी एखादा नवीन पदार्थ बनवायला आवडतो..
रोजचे जेवण बनविणे या व्यतिरीक्त फारसे काही येत नाही, स्वयंपाकातले अंदाज सहसा चुकत नाहीत..
भटकायला खुप आवडतं, आळशीही आहे मी खुप..
सगळ्यात मजेशीर गोष्ट माझा नवराही कर्क राशीचा आहे.. आश्लेषा नक्षत्र.. Happy
दोघांची लग्न रास धनु आहे..
आता पुढील गमती जमती जाणकारांनी सांगाव्यात.. Happy

Pages