राशींनुसार व्यक्तिमत्त्वाचे नमुने

Submitted by निंबुडा on 15 February, 2012 - 05:34

खूप लहान असताना श्री. शरद उपाध्ये यांचा "राशीभविष्य" (की "राशीरंजन") हा कार्यक्रम पाहिला होता. त्यात प्रत्येक राशीच्या लोकांचे स्वभावविशेष विनोदी ढंगात (बर्‍याचदा अतिशयोक्तीपूर्ण प्रसंगांचा आधार घेऊन) सादर केलेले होते. त्यातला विनोदनिर्मिती साठी वापरलेल्या अतिशयोक्तीपूर्ण प्रसंगांचा भाग सोडून द्या! पण राशींचा जो बेसिक स्वभाव असतो तो त्या त्या राशींच्या सर्व लोकांना तितक्याच प्रमाणात अप्लिकेबल असतो का?? मला तरी तसे वाटत नाही. कारण मग जगात फक्त १२ राशींप्रमाणे १२ प्रकारचेच स्वभाव असलेली माणसे असली असती. म्हणजे जगातल्या सर्व लोकांना फक्त १२च कॅटेगरीत विभागता आले असते. म्हणजेच अमुक एक जण अमुक राशीचा म्हणून त्या त्या राशीसाठी प्रसिद्ध असलेले सर्व स्वभाव विशेष त्यात असतीलच असे नाही.
उदा. कर्क - या राशीची माणसे प्रेमळ स्वभावाची असतात. स्वयंपाकघरात रमणारी असतात. (पुरुष असले तरीही).
सिंह - खमकी लोकं असतात.
कन्या - संशयी स्वभाव. आत्मविश्वासाचा अभाव.
तूळ - बॅलन्स्ड व्यक्तिमत्त्व
इ.इ.
राशीप्रमाणे तुमचा स्वतःचा आणि जवळच्या लोकांचा तुमचा काय अनुभव आहे? प्रत्येक वेळी राशीवरून व्यक्तीचा बेसिक स्वभाव (संपूर्ण स्वभाव नाही) जज करता येतो का?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कंपनीत उमेदवाराची पत्रिका शरद उपाध्येंना दाखवुन मगच नोकरी देतात असं ऐकलं होतं!>>
Lol

हे चांगलं आहे उद्या उमेदवार पसंद पडला नाही की मी पत्रिका जुळत नाही असं सांगेन Proud

सिंह लोकांकडे नेतृत्व आपसूक येते. बर्‍याच क्षेत्रातली त्यांना (जुजबी) माहिती असते त्यामुळे ते सेंटर ऑफ अट्रॅक्शन होतात. प्रेम केले तर मनापासून आणि दुस्वास केला तर तोही मनापासून. एखाद्याला आपले मानले तर, त्याच्यासाठी रक्ताचे पाणी करतील. पण मेहनतीत कमी पडतात (अंगात आळस असतो.)>>>>>
१००% खरं आहे, माझी आई, आणि सासरे सिंह राशीचे आहेत..

माझी रास ओळखा पाहू...!! Happy

ठोकताळे बर्‍यापैकी लागू पडणारी अनेक उदा. आहेत आसपास.
वॄषभ - जवळच्या नात्यातील ४ जणी - नटण्यामुरडण्याची प्रचंड हाउस. शरद उपाध्येंच्या म्हणण्यानुसार दूध आणायला पण शालू नेसून जातील - अगदी लहानसे हळदी-कुंकू पण लग्नाच्या थाटात करतात. Happy
आणि एक वॄषभ मुलगा - त्याचे कपड्यांचे कपाट त्याच्या बायकोपेक्षा जास्त भरले आहे. Happy आणि राहतो सुधा एकदम टापटीप. Happy
वॄश्चिक - ४ मैत्रिणी Happy नांगी, सूड इ. थोड्या प्रमाणात आहे पण दिनेशदा म्हणाले तसं प्रचंड हुशार, कष्टाळू, आणि कायम गुणवत्तेचा ध्यास घेतलेला. काही प्रमाणात फटकळ सुध्दा.
मीन - २ मित्र - सतत चंचल. विचारात चलबिचल आणि कायम हालचाल पण त्यामुळे खूप कार्यरत राहतात. काहीना काही चालू असत. अनेक विषयात जॅक ऑफ ऑल.
कर्क - शाळेतील ३ शिक्षिका. खूप प्रेमळ. आणि स्वयंपाक घरात रमणार्‍या आहेत हे त्या शिकवताना पण कळायचं. गणितातील उदाहरणे देताना पण किचन मधल्या घटनांची उदा जास्त असायची. Biggrin

मीन राशीचा स्वभाव वरती लिहिलाय ना , की कुलुप सतत चेक करून पहाणे हे खूप खरे आहे वाटते. एका रूमीचा अनुभव. त्यामुळे +१

वृषभः नाटकी, लबाड... (बहुधा त्यांचा नीच राशीचा सबंध पत्रीकेत आला की असे गुण असतात असे वाचलेय की असे गुण दाखवतात) Proud

कुंभः विचार करतात खूप वाटतं.

धनू: धुर्त असतात. योग्य वेळी पुंगी बाहेर काढून वाजवतील. Proud

कन्या राशी: किटकिटे, संशयी, आत्मविश्वास कमी. त्यात मिथूनची साथ असेल (लग्न रास असेल तर) वायफळ बडबड..(भिती लपवायला)....

आता माझी रास ओळखा? Proud

मास्तुरे, तुमचे वर्णन बरेच जुळतय जे काही राशी बद्दल लिहिलय त्यावरून

जन्मतार‍खेवरून काढलेली रास चुकीची अस्ते का ?

मला १-१५ डिसेंबर मधे जन्मलेल्या आणि १६-३१ डिसेंबरमधे जन्मलेल्यांची ( मुली ) रास कुणी सांगू शकेल का ? त्यावरून स्वभाव पण कळावा ही अपेक्षा.

लोला, धन्यवाद माझी रास सांगण्याबद्दल. Happy पण दुर्दैवाने चूक. Wink

कन्या व मिथून तर बिलकूल नाहीच. माझी रास ह्यातली काही असती तर लिवले असते का असे काही बाही? Wink जरा डोकं लावा की वो...

चक्कर(लोकं... हो) येवून पडतील खरी रास सांगितली तर.

लोकं म्हणतात लिखाणाने रास ओळखता येते.. मी सांगते चूक आहे ते. Proud

लग्न रास + चंद्ररास ह्याचा संगम हा मनुष्य स्वभाव असतो.

परत त्यात नीच राशीची साथ (:फिदी:) असेल त्या घरात वा ग्रहाबरोबर तर मग मज्जानु लाईफ. Wink

लग्न रास + चंद्ररास
वृषभ + कन्या
कन्या + मिथून
वृश्चिक + मिथून
वगैरे वगैरे...

लोला, तुझे गुण सांगू का?( गुण म्हणजे राशीगुण)

नवरा वृषभ व बायको तूळ हे खूपच छान कॉम्बिनेशन असते (रसिक नवरा व कलाप्रेमी बायको).

दोघेही मिथुन असतील तर मग रोज तलवारींचा खणखणाट आणि ठिणग्या.

बायको मेष/धनु/सिंह व नवरा कर्क/मीन असेल तर तो सुखी संसार असतो ज्यामध्ये नवरा स्वखुषीने बायकोच्या मुठीत राहतो व बायको खमकी असल्याने कर्क/मीन राशीच्या गरीब नवर्‍याचा कोणालाही गैरफायदा घेऊन देत नाही.

नवरा व बायको हे दोघेही कर्क किंवा मीन असतील किंवा एकजण कर्क व दुसरा/री मीन असेल तर फार वाईट. दोघेही सज्जन, जगाकडून फसणारे, भोळे असतात व त्यामुळे दोघांचीही फसगत होते.

काही ग्रह दोनदोन राशींचे स्वामी आहेत, पण त्याचे गुणविशेष वाटले गेले आहेत.
मेषेचा व वृश्चिकेचा स्वामी मंगळ. पण मंगळाची दाहकता, लढावू वृत्ती मेषेत आहे तर मंगळाची प्रतिशोध घेण्याची वृत्ती वृश्चिकेत आहे.

तसेच धनु व मीनेचा स्वामी गुरू. पण गुरूची तेजस्विता, धीरगंभीरता धनुकडे आहे तर गुरूची धार्मिकता व सात्विकता मीनेकडे आहे.

वृषभ व तूळेचा स्वामी शुक्र. वृषभेकडे शुक्राची रसिकता आहे तर तूळेकडे शुक्राची कलासक्तता.

शनीची कठोर न्यायवृत्ती, परिश्रम करण्याची वृत्ती, इ. मकरेकडे आहे, तर शनीचा बुद्धिवाद, अधिकार, ज्ञान व अहंकार कुंभेकडे आहे.

सिंह - खरं बोलणं टाळतात किंवा खरं पटकन अ‍ॅक्सेप्ट करत नाहीत. बरोबर आहे का? आतापर्यंत बघितलेल्या सिंह व्यक्ती.

सिंह - खरं बोलणं टाळतात किंवा खरं पटकन अ‍ॅक्सेप्ट करत नाहीत. बरोबर आहे का? आतापर्यंत बघितलेल्या सिंह व्यक्ती.
<< म्हणूनच नेते असतात म्हणे :).

>>> मास्तरा, तुझी रास नक्की मिथुन असणार. क्रिकेटच्या बाफवरच्या बडबडीवरून >>> म्हणतोय मी

>>> चूक. इतरांप्रमाणे मी पण तूळ!

मास्तरा, तुझी खरी रास तूळ नाही 'वातुळ' आहे. Lol

चिमण Lol

मी कलासक्त, पाककलेची आवड, संशोधक वृत्ती, मेहनती, बर्‍यापैकी जिद्दी, स्वावलंबी, पझेसीव्ह, लीडर, थोडी रागीट पण खुप हळवी ....

माझी रास ओळखा बर Wink

>>वृश्चिक + मिथून

या दोन राशींचे एकमेकांशी अजिबात जमत नाही. षडाष्टक योग असतो. म्हणजे सर्व राशींना एका घडाळाच्या आकड्यांप्रमाणे गोलात मांडल्यास एका राशीपासून दुसरी आठवी तर दुसरी पासून पहिली सहावी येते. लिंबूकाका यावर अधिक प्रकाश टाकाल का प्लीज.

पेपर मध्ये आलेलं राशीभविष्य हा टिपी म्हणून वाचण्याचा विषय आहे माझ्यासाठी तरी. पण ओळखी झाल्यानंतर त्या व्यक्तीची आपण प्रेडिक्ट केलेली रास करेक्ट होती का हे जाणून घ्यायला मजा येते.>>>>>> अगदी अगदी Happy

वृश्चिकेचा एक चांगला गुण म्हणजे ते कायम असमाधानी असतात. असमाधान असते ते स्वत:च्याच कामगिरीवर. त्यामूळे ते सतत प्रगती करायचा प्रयत्न करत असतात आणि त्यासाठी प्रचंड कष्ट करायची त्यांची तयारी असते. >>>>>>>>> १००००००००००००००००००००००००००००

मी वृस्चिक. सतत डोक्यात कसले ना क्सले विचार सुरू...घरी वा हपिसात स्वस्थ बसणे जमत नाही. जे डोक्यात येतं ते करण्यासाठी प्रचंड धडपड करण्याची वृत्ती. ५०% हळवी (भावनाप्रधान) +५०% प्रॅक्टीकल...तसेच बेस्ट फ्रेंड आणि वर्स्ट एनिमी. प्रेम असो, मैत्री असो, राग-रुसवा असो,आनंद-दु:ख व्यक्त करणे असो....सारं काही एक्स्ट्रीम!

माझा अनुभव असा:

व्रुस्चिकेच्या व्यक्ती प्रचंड मेहनती आणि सहनशील असतात. सहसा राग येत नाही, पण आला की लवकर निवळत नाही. साठलेल्या रागाचा उद्रेक झाला की कुणीही त्यांना थांबवू शकत नाही. स्वानुभवावरून सांगतेय स्कॉरपियन्स नागासारखे डूक धरून मग सावकाश वार करायला कमी करत नाहीत. मी व माझी आत्या दोघी वृस्चिकेच्या...त्यामुळे माझी आत्येबहिण मला व तिच्या आईला म्हणजे माझ्या आत्याला बॉम्ब म्हणते. Proud

माझी आई: वृषभ रास. कलानिपूण. शिवणकाम, भरतकाम, रांगोळी, अशा विविध कलांमध्ये एक्स्पर्ट!

माझी मोठी बहिण सिंह : प्रचंड बडबडी. नेतृत्वाचा गुण मात्र अ‍ॅप्रिशियेबल! अत्यंत खमकी.धीर देणारी. थोडा रागीट व डोमिनेटींग स्वभाव.

लहान भाऊ: तूळ. अत्यंत हुशार व विनोदी स्वभाव. तितकाच आळशी.

वडील : कुंभ रास. जेवढा प्रेमळ तेवढाच तापट स्वभाव. जगाची पर्वा न करता हवं ते व योग्य वाटेल तेच करण्याची वृत्ती. विनोदी व कष्टाळू व्यक्तिमत्व.

जवळची मैत्रीणः तूळ रास.: अतिशांत पण हुशार आणि विचारी स्वभाव. हळवी, मायाळू.

जवळचा मित्र सिंह रास: थोडा रागीट व डोमिनेटींग स्वभाव. प्रचंड हट्टी व निष्काळजी. जे हवं तेच करणार, मिळवणार. मातृप्रेमी.

>>>>> एखाद्याचा चंद्रराशीवरून जो स्वभाव येतो तोच सूर्यराशीवरून आला नाही तर ते एक Contradiction नाही का? <<<<
बरोबर आहे प्रश्न! असे विरोधाभास असतात म्हणून तर "व्यक्ति तितक्या प्रकृती" (इथे प्रकृती म्हणजे केवळ तब्येत अशा अर्थाने घ्यायचे नाही, व्यापक अर्थ घेणे अपेक्षित)
चंद्र मनाचा कारक असल्याने च्रंद्र राशीवरुन व्यक्ति "काय पद्धतीने रिअ‍ॅक्ट होईल, प्रतिसाद्/प्रतिक्रिया देईल, वा एखादी घटना काय पद्धतीने "आकलन" करेल, समजुन घेईल, हे समजते. व त्यावरुन व्यक्तिचे "बाह्य प्रकटीकरण" अर्थात "स्वभाव" कळला असे आपण तिर्‍हाईत म्हणतो.
प्रत्यक्षात, व्यक्तिचे केवळ प्रकटीकरण चंद्रावरुन कळू शकते, पण तरीही अंतर्मनातील खळबळ समजायला बाकि ग्रहराशी यांची स्थानगत फळे विचारात घ्यावीच लागतात. त्यामुळेच, वरवर पहाता आत्यन्तिक प्रेमळ भासणारी व्यक्ति प्रत्यक्षात गुप्तपणे कटकारस्थाने करणारी/वा कुजक्या वृत्तीची असू शकते, तर दुसरीकडे वरवर आनंदी/उत्साही वाटणारी व्यक्ती प्रत्यक्षात घोर चिंतेने ग्रासलेलि/कुढत असलेलीही असू शकते. अन असणे, नुस्त्या राशी वरुन नव्हे तर कुंडलीवरुन बघुनच समजु शकते.
रविराशीचा वा रवीचा संबंध, व्यक्तिच्या अंतर्गत उर्जेशी/जीवशक्तिशी लावला जातो. व बाह्य प्रकटीकरणात, अशी गरज नसते की ही उर्जा दुसर्‍यान्ना सतत दृगोच्चरच व्हावी. कारण एखाद्या खेळाडूमधे असलेली दृष्य स्वरुपातील ही उर्जा, अन्दमानात खितपत पडलेल्या पण तरीही विजिगीषु वृत्तीचेच चिन्तन करणार्‍या सावरकरान्मधे नव्हती असे म्हणता येईल का? त्यांचेपाशी असलेली ती उर्जा बाहेर कुणाला दृगोच्चर होत नव्हती, पण तब्बल चौदावर्षे पेक्षा जास्त काळ तिकडे खितपत पडूनही, ५० वर्शान्च्या दोन जन्मठेपान्च्या शिक्षा असुनहि, त्यान्नी आशा/उमेद सोडली नव्हति, व अशी आशा/उमेद राखण्यास रवीशक्तिचाच उपयोग होतो. ही केवळ भावनिक इच्छा वा विचार नसतो. कदाचित मी नेमक्या शब्दात सान्गू शकलो नाहीये असे वाटते. पण मनाचा हळवेपणा व कठोरपणा यात आपण जो फरक करु, तोच चंद्र-सूर्य यांचे कारकत्वात दिसुन येतो.

>>>>> किंवा एखाद्याची चंद्ररास वृश्चिक आणि सूर्यरास तूळ असेल तर ते बॅलन्स्ड नांग्या मारतात का? <<<<<
चन्द्र वृश्चिकेचा असेल, तर तो कष्टाळू असेलच, पण त्याच्या व्ययातील तुळेतील नीचेचा रवि प्रतिष्ठा/प्रसिद्धीबाबत काही कुयोग दर्शवेल. प्रवास खुप होईल, पण तो कष्टकारक असेल. अशा ग्रहस्थितीत नान्गी मारणे फार दूरचे, तसा विचारही करु शकणार नाही, अशि परिस्थिती समोर असू शकेल, व आयुष्यातील बराच काळ परिस्थितीजन्य अडचणीन्पुढे दबुन कण्ठावा लागेल. (अर्थात, इतर ग्रह, खास करुन गुरू, मंगळ जर चांगले शुभयोगात असतील, तर या परिस्थितीवरही मात होईलच, व हे मागिल भोग भोगुन सम्पले जातिल)

मंदार, वृश्चिक मिथुन षडाष्टक आहे, मात्र याचा विचार केवळ "लग्न संबधामधे" केला जातो/करावा लागतो. अन्य ठिकाणी देखिल हे षडाष्टक कार्यरत असले तरी विचार होत नाही, अहो कारण तुमचा बॉसच षडाष्टकी असेल, तुम्ही काय करणार? बॉस बदलणार? की नोकरी बदलणार? असो. विवाहसंबधाव्यतिरिक्त त्याचा तितका बाऊ करणेचीही गरज नाही.

सिंह रास: थोडा रागीट व डोमिनेटींग स्वभाव. प्रचंड हट्टी व निष्काळजी. जे हवं तेच करणार, मिळवणार. मातृप्रेमी.
बहिण सिंह : प्रचंड बडबडी. नेतृत्वाचा गुण मात्र अ‍ॅप्रिशियेबल! अत्यंत खमकी.धीर देणारी. थोडा रागीट व डोमिनेटींग स्वभाव>>>>>>

टोकु पटलं ग !! अगदी अगदी... मी बहुतांशी अशीच आहे. दिनेशदा सिंह असले तरी त्यांची लग्न रास कर्क असावी.

माझं बहुतेक डेडली कोम्बो आहे चंद्र रास सिंह. लग्न व सुर्य रास ( तारखे प्रमाणे) मिथुन.

Proud मज्जा चाललिये इथे

@ दिनेश - मला तुम्ही कर्क राशीचे वाटला होतात. आणि तुम्ही माझी रास अचूक ओळखलीत. मी हार्डकोर कर्क आहे, पण एक घोळ आहे, त्यात सिंह राशीचं मिक्श्चर असल्याने मी कर्क आहे यावर सहसा कोणिही विश्वास ठेवत नाही.
मला घरात रमायला आवडतं, स्वयंपाक करायला आवडतो असं म्हणलं की लोक मला हसतात. Sad

बाय द वे हे चंद्ररास/सूर्यरास/लग्नरास काय भानगड आहे? Uhoh

माझी पत्रिकेतली रास कर्क, जन्मतारखेप्रमाणे सिंह, लग्न रास लक्षात नाहीये. Happy
जरा विस्कटून सांगा बघु.

बाय द वे हे चंद्ररास/सूर्यरास/लग्नरास काय भानगड आहे? >> मी पण वर लग्नरास काय असते ते विचारलं होतं.

सनसाइन - जन्मदिवसाप्रमाणे असते. चंद्ररास - पत्रिकेत असते आणि लग्नरास काय भानगड आहे? मला सन&मुन साइन माहित आहे. तिसरी असते इथेच कळलं.

लिंब्या... रविराशी बद्दलचे विवेचन पटले... अनुभवा वरुन तरी मला असेच वाटते की रविराशीचा संबंध अंतर्मनाशीच जास्त असतो.

बाय द वे हे चंद्ररास/सूर्यरास/लग्नरास काय भानगड आहे? >> भानगड नाही ओ... हे वाचा
limbutimbu | 15 February, 2012 - 16:50
>>> १. लग्न राशी वरुन म्हणजे पत्रिकेतील पहिल्या स्थानात जी रास असेल त्या वरुन संबंधीत व्यक्तीच्या स्वभावाचे वर्णन केले जाते.
२. चंद्र राशी वरुन कर्म संबंधीत भाकीत केले जाते. <<<<
इन्द्रा, बरोबर, पण,
लग्न राशीवरुन सहसा तब्येत/शरिरयष्टी इत्यादिक बघितले जाते. नशिबात काय काय वाढुन ठेवलय ते बघितले जाते, तर चंद्र राशीवरुन, मिळालेली नशिबाची बैठक कशी वापरली जाईल् ते बघितले जाते. अर्थात, चंद्र मनाचा कारक असल्याने स्वभाव देखिल चंद्रराशिवरुन बघितला जातो.
बरेचदा;
१. लग्नी अथवा चंद्रासोबत कोणता बलिष्ठ ग्रह असेल्,तर राशिसहितच त्या त्या ग्रहाचे परिणामही स्वभावावर स्पष्ट आढळून येतात.
२. लग्न रास व चंद्र रास, यांचे मधिल योगाचे तानमानाने, लग्नरास चालेल, की चंद्ररास, ते ठरवावे लागते.
३. बारा राशीव्यतिरिक्त, वर म्हणल्याप्रमाणे नक्षत्र (त्यातिल एक चतुर्थांश भागाचा विचार करीत), चन्द्र रास, लग्नरास, आणि महत्वाचे ग्रहयोग/लग्नचन्द्रातील योग इत्यादीन्चा समुच्चित विचार करुन मगच अचूक प्रेडिक्शन करणे शक्य होते.

>>>> तुमचा काय अंदाज? काय असेल माझी रास? <<<
आगावा, ज्योतिषशास्त्र आम्हाला कुन्डलीवरुन "गरजवंताच्या" भविष्याचे "अन्दाज" बान्धायला परवानगी देते
कुन्डली नसताना, कुन्डलीची गरजच व्यक्तिला भासलेली नसताना, व्यक्तिच्या "राशीचे" (वा तत्सम कसलेही) अन्दाज बान्धायला (अन पुन्हा ते जाहिर करायला) परवानगी देत नाही. Proud
त्यापेक्षा तू पत्रिका करुन घे, जन्मवेळ्/जन्मदिनान्क/ठिकाण कळव, तुझी कुन्डलीच मान्डतो.
नेट वर देखिल असंख्य साईट्स आहेत, जिथे तुला ऑनलाईन कुन्डली बघायला मिळेल Happy

निंबुडाने सुरवातीला लिहिलेय तसे अगदी १२ साचे नसतात. पण जे मिश्रण असते त्यानेच तर आयुष्य चालते.
आर्चने लिहिलेय तसे सिंह सत्यापासून दूर जात नाहीत, पण ते स्वतःबद्दल फारच कमी बोलतात. अनेकांना त्यांच्या व्यक्तीमत्वाचा केवळ एकच पैलू दिसत असल्याने, त्यांची पूर्ण क्षमता लोकांच्या लक्षात येत नाही.

हट्टी आणि मानी, हे पण स्वभावविशेष आहेतच.
(मला वाटतं सुनील गावस्कर आणि सचिन दोघेही सिंह आहेत. )

शिवाय, सार्वजनिक जीवनात अनेकदा बुरखे घ्यावे लागतात. ते दुसर्‍या राशीचे पण असू शकतात.

Pages