राशींनुसार व्यक्तिमत्त्वाचे नमुने

Submitted by निंबुडा on 15 February, 2012 - 05:34

खूप लहान असताना श्री. शरद उपाध्ये यांचा "राशीभविष्य" (की "राशीरंजन") हा कार्यक्रम पाहिला होता. त्यात प्रत्येक राशीच्या लोकांचे स्वभावविशेष विनोदी ढंगात (बर्‍याचदा अतिशयोक्तीपूर्ण प्रसंगांचा आधार घेऊन) सादर केलेले होते. त्यातला विनोदनिर्मिती साठी वापरलेल्या अतिशयोक्तीपूर्ण प्रसंगांचा भाग सोडून द्या! पण राशींचा जो बेसिक स्वभाव असतो तो त्या त्या राशींच्या सर्व लोकांना तितक्याच प्रमाणात अप्लिकेबल असतो का?? मला तरी तसे वाटत नाही. कारण मग जगात फक्त १२ राशींप्रमाणे १२ प्रकारचेच स्वभाव असलेली माणसे असली असती. म्हणजे जगातल्या सर्व लोकांना फक्त १२च कॅटेगरीत विभागता आले असते. म्हणजेच अमुक एक जण अमुक राशीचा म्हणून त्या त्या राशीसाठी प्रसिद्ध असलेले सर्व स्वभाव विशेष त्यात असतीलच असे नाही.
उदा. कर्क - या राशीची माणसे प्रेमळ स्वभावाची असतात. स्वयंपाकघरात रमणारी असतात. (पुरुष असले तरीही).
सिंह - खमकी लोकं असतात.
कन्या - संशयी स्वभाव. आत्मविश्वासाचा अभाव.
तूळ - बॅलन्स्ड व्यक्तिमत्त्व
इ.इ.
राशीप्रमाणे तुमचा स्वतःचा आणि जवळच्या लोकांचा तुमचा काय अनुभव आहे? प्रत्येक वेळी राशीवरून व्यक्तीचा बेसिक स्वभाव (संपूर्ण स्वभाव नाही) जज करता येतो का?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तूळ - प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे, संगीत्/गायन्/चित्रकला/अभिनयकला अशा कलेत रस असणारे
मीन - अतिशय सज्जन, धार्मिक, अतिशय मनापासून देवपूजा करणारे, देवळात जाऊन देवाला अनेकवेळा नमस्कार
---------------------------------------------------------------------------------------------------
<<< म्हणजे मी ७०-८०% मीन आणि उरलेली तूळ.>>> Biggrin बहुतेकांना ह्या राशीचे गुणधर्म पाहता स्वतःविषयी असेच वाटत असेल. पण हे इतरांनी म्हणायला हवे. म्हणजे त्यांना तसे तुमच्याविषयी वाटायला हवे. Biggrin अश्विनी के, Light 1 घ्या बरंका. Proud

>>> माझी पण ओळखा बरे मास्तुरे

इथेच थांबतो. नाहीतर काही वेळाने इथे नेहमीच्याच यशस्वी टॉपिक्सवर युद्ध सुरू व्हायचं.

>>> मास्तरा, तुझी रास नक्की मिथुन असणार. क्रिकेटच्या बाफवरच्या बडबडीवरून म्हणतोय मी

चूक. इतरांप्रमाणे मी पण तूळ! Rofl

एखाद्याचा चंद्रराशीवरून जो स्वभाव येतो तोच सूर्यराशीवरून आला नाही तर ते एक Contradiction नाही का?

किंवा एखाद्याची चंद्ररास वृश्चिक आणि सूर्यरास तूळ असेल तर ते बॅलन्स्ड नांग्या मारतात का? Proud

मंदार तू बिघडलेला वृषभ! Lol

मास्तरा, तू एकटाच नाहीयेस माझी मिथुन रास आहे म्हणणारा.. आधी एकाने मला रात्री फिरायला आवडतं म्हणून मी मिथुन तर दुसर्‍याने मला जोक करायला आवडतात म्हणून मी मिथुन असं सांगितलंय.. थोडक्यात काय तर मी इथून तिथून मिथुन! Wink

>>> किंवा एखाद्याची चंद्ररास वृश्चिक आणि सूर्यरास तूळ असेल तर ते बॅलन्स्ड नांग्या मारतात का?

तूळवाले अजिबात नांग्या मारत नाहीत.

>>> मंदार तू बिघडलेला वृषभ!

मंदार अजिबात बिघडलेला किंवा सुधारलेला वृषभ वाटत नाही.

>>>> आता खरं सांगा मास्तुरे तुमचा अंदाज काय होता माझ्या राशीबाबत?

सांगायला हरकत नाही. बरीचशी लक्षणे मिथुनचीच आहेत, पण इतर राशींचीही वैशिष्ट्ये आहेत. नंतर सांगतो.

<<मंदार तू बिघडलेला वृषभ>>
Lol
रास बघून सांगताय की मंदार ला बघून........ Proud

माझी (खरोखर) तूळ

व्वा! राशीरंजन कार्यक्रम छान रंगलाय.
नुसत्या राशीवरून स्वभाव कळत नाहीत. लग्नरासही प्रभाव पाडते व्यक्तिमत्व आणि स्वभावावर.
हा माझा अनुभव. चंद्ररास कोणत्या स्थानी आणि कोणाच्या युतीत/दृष्टीत वगैरे हे ही महत्वाचं.
लिंबूटिंबू यांनी छान माहिती दिलेली आहे.
आमच्या जवळच्या नात्यातली एक व्यक्ती. अतिशय आत्ममग्न. कठोर, नातवंडाबद्दलही भावनेचा ओलावा नाही. आणखी बरंच काही. रास??? कर्क!!! अष्टमस्थानी.

मुळात माझी जन्मतारीख व वेळ याबद्दल घोळ आहे. माझा जन्म हॉस्पिटलमधे न होता घरातच झाला. पण जन्मवेळ, तारीख इ. नोंदवून ठेवण्याची कुणाला गरज भासली नाही! शिवाय दुसरे महायुद्ध चालू असल्याने, सरकारने वेळ एक तास मागे की पुढे केली होती, भारतीय पद्धतीप्रमाणे १६ तारखेचा सूर्योदय होइस्तवर १५ तारीखच धरतात, पण इंग्रजी पद्धतीने रात्री बारालाच तारीख बदलते! त्यामुळे आईला सुद्धा नक्की सांगता येत नाही. अमेरिकेच्या व्हिसा साठी त्यांनी बर्थ सर्टिफिकेट मागितले. मग माझ्या लहान भावाने शपथेवर सांगितले की माझा जन्म त्याच्या जन्माच्या तीन वर्षे आधी झाला होता, मग एकदाचे कागदोपत्री बर्थ सर्टिफिकेट झाले.

(नागपुरात आमची फार वट होती हो. लोक, काय हवे असेल ते मुकाट्याने घरी येऊन देत)

त्यानंतर मी गेले पाच सहा वर्षे, कालनिर्णय मधले संपलेल्या महिन्यांचे राशीभविष्य वाचतो नि कुठल्या राशीच्या भविष्यानुसार माझा महिना गेला ते नोंदवून ठेवतो. अजून निर्णय घेण्याइतकी नक्की माहिती जमली नाही.

निरनिराळ्या लोकांनी माझी रास सिंह किंवा मिथून किंवा मकर असावी असे सांगितले आहे. पण
वरच्या लिखाणाप्रमाणे मी कन्या राशीचा असावा, आत्मविश्वासाचा अभाव, दुसर्‍यावर विश्वास टाकणे कठीण वगैरे,

माझी खुण 'तराजु'. खरंच! तराजु शप्पथ! Happy

पण ते लग्नरास काय असतं? माझी पत्रिकाच नाही. लग्न झालं तेव्हा कोणती रास असते, ते का? कशी बरं कळते लग्नरास?

पनवेलमधील सुप्रसिद्ध 'धूतपापेश्वर' या आयुर्वेदीक औषधांच्या कंपनीत उमेदवाराची पत्रिका शरद उपाध्येंना दाखवुन मगच नोकरी देतात असं ऐकलं होतं!
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

कैच्याकै माहिती..... माझा क्लायंट आहे तो.... डायरेक्टर ऐकेल हे तर फिट येऊन पडेल.

मीन - अतिशय सज्जन, धार्मिक, अतिशय मनापासून देवपूजा करणारे, देवळात जाऊन देवाला अनेकवेळा नमस्कार
>>>>>>>>>>>>>>>>>

सानी, मी पण मीन Happy

तुमाखमै.

Pages