राशींनुसार व्यक्तिमत्त्वाचे नमुने

Submitted by निंबुडा on 15 February, 2012 - 05:34

खूप लहान असताना श्री. शरद उपाध्ये यांचा "राशीभविष्य" (की "राशीरंजन") हा कार्यक्रम पाहिला होता. त्यात प्रत्येक राशीच्या लोकांचे स्वभावविशेष विनोदी ढंगात (बर्‍याचदा अतिशयोक्तीपूर्ण प्रसंगांचा आधार घेऊन) सादर केलेले होते. त्यातला विनोदनिर्मिती साठी वापरलेल्या अतिशयोक्तीपूर्ण प्रसंगांचा भाग सोडून द्या! पण राशींचा जो बेसिक स्वभाव असतो तो त्या त्या राशींच्या सर्व लोकांना तितक्याच प्रमाणात अप्लिकेबल असतो का?? मला तरी तसे वाटत नाही. कारण मग जगात फक्त १२ राशींप्रमाणे १२ प्रकारचेच स्वभाव असलेली माणसे असली असती. म्हणजे जगातल्या सर्व लोकांना फक्त १२च कॅटेगरीत विभागता आले असते. म्हणजेच अमुक एक जण अमुक राशीचा म्हणून त्या त्या राशीसाठी प्रसिद्ध असलेले सर्व स्वभाव विशेष त्यात असतीलच असे नाही.
उदा. कर्क - या राशीची माणसे प्रेमळ स्वभावाची असतात. स्वयंपाकघरात रमणारी असतात. (पुरुष असले तरीही).
सिंह - खमकी लोकं असतात.
कन्या - संशयी स्वभाव. आत्मविश्वासाचा अभाव.
तूळ - बॅलन्स्ड व्यक्तिमत्त्व
इ.इ.
राशीप्रमाणे तुमचा स्वतःचा आणि जवळच्या लोकांचा तुमचा काय अनुभव आहे? प्रत्येक वेळी राशीवरून व्यक्तीचा बेसिक स्वभाव (संपूर्ण स्वभाव नाही) जज करता येतो का?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा.. Lol
माझा नवरा चित्रपट्वेडा आहे, तितकेच मला सिनेमे कंटाळवाणे वाटतात, मला आर्ट सिनेमे आवडतात, तो ढुंकूनही बघत नाही..
मला शास्त्रीय संगीत आवडते तो तितकेच नाक मुरडतो.. Happy

सानी, बहुतेक मिथुन आणि कन्याचे मिश्रण !
(माबोरास !!)>>> देवा रे! मला तुम्ही आगाऊच्या कॅटेगरीत टाकलेत! Sad इतकं छळते का मी तुम्हाला? Lol मानसशास्त्रात एक मॉडेल आहे, जोहरी विन्डो म्हणून त्याचीच आठवण झाली. johariwindowmodeldiagram3.jpghttp://en.wikipedia.org/wiki/Johari_window
माझ्या 'माबो' व्यक्तीमत्त्वाचा दुसरा हिस्सा तुम्ही माबोकरच ओळखू जाणे! Proud

मी वृषभ आणि माझा नवरा तुळ..
मला धडाडीचे निर्णय घेऊन अंमलबजावणीची सवय म्हणजे काठाशी उभं राहून पाणी गार की गरम- असला विचार न करत बसता सरळ उडी घेणारी- होऊ देत जे व्हायचंय ते अशी, तर हा मात्र सारासार विचार करून (बर्‍यापैकी वेळ घेऊन) मग निर्णय घेणारा म्हणजे आता वातावरण असे-असे आहे तर पाणी गारच असणार मग त्यानुसार स्वतःला प्रोटेक्ट करण्याची व्यवस्था आधी बघा Proud

वृषभ आणि तुळ हे कॉम्बो अजीब आहे, हे नक्की Happy

दिनेशदा, राशीभविष्य व न्युमरॉलॉजीप्रमाणे एखाद्या माणसाचे स्वभावविशेष सारखेच असायला हवे ना? लिंबुभाउ - तुम्हीसुध्धा यावर प्रकाश टाकू शकता.

दिनेशदा, 'माबोरास' हा एकदम झकास प्रकार तयार केल्याबद्दल अभिनंदन Lol
सानी, तुझी चंद्ररास माहिती नाही पण सौररास 'पाईसेस' किंवा 'व्हर्गो'!

पनवेलमधील सुप्रसिद्ध 'धूतपापेश्वर' या आयुर्वेदीक औषधांच्या कंपनीत उमेदवाराची पत्रिका शरद उपाध्येंना दाखवुन मगच नोकरी देतात असं ऐकलं होतं!
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

<<कैच्याकै माहिती..... माझा क्लायंट आहे तो.... डायरेक्टर ऐकेल हे तर फिट येऊन पडेल<<

पनवेल मधे गेल्या ४५ वर्षापासुन रहात असलेल्या माझ्या मामीने हे सांगितल. तिच्या बहिणीचा नवरा त्या कम्पनीत आहे. विश्वास ठेवा अगर ठेवु नका. काही वेळेस या आतल्या गोष्टी असतात...मॅनेजमेंट स्वतःच हे कसं सान्गेल?

चंद्ररास मीन + लग्नरास मेष ह्या कॉम्बोचे लोक पाहीलेत म्हणून लिहितेय.

मीनः गुरु चांगला असेल व पत्रीकेत एकटाच असेल( दुसरा ग्रह नसेल तर) तर गुरुसारखा स्वभाव. उगाच त्रास देणार नाहीत कुणाला, अंमळ गरीब, मदत करायची सवय, दिलेले काम करतात नीट.बुधाची साथ असली तर जरा विनोदी स्वभाव.
पण लग्नरास मेष मग परखड बोलणे. मनात असेल तर बोलून दाखवतात. सहसा चिडत नाहीत पण भडकले की समोरच्याला मस्त "समज" देतीलची जर त्याची चूक असेल तर. छोडेगा नही जी पद्धतीने.

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

झंपी ... आईशप्पथ परफेक्ट.

गुरू एकटा आणि स्वराशीत आहे. बुध पण उच्चीचा आहे.

धन्स..... एकदम पटलं.

फक्त डिसिजन घेताना द्विधा मनःस्थिती असते..... मॉरल सपोर्ट लागतो Happy

सारिका, मला मिथुनच वाटतेय (मला कुणी नाही बोलावलं... अशी पोस्ट्स )

साने, हळवी आहेस फार. आणि हे कन्येचे लक्षण.

मामा पैलवान मला मेषेचे वाटतात. (रोखठोक पणा !! म्हणजे नम्रता दाखवायची पण थेटपणे.)

काठाशी उभं राहून पाणी गार की गरम- असला विचार न करत बसता सरळ उडी घेणारी- होऊ देत जे व्हायचंय ते >>
बागे, इथे पण सेम पिंच गं. खूप अ‍ॅनालिसिस करत बसायला आवडत नाही. थोडीशी रिस्क उचलायची आणि परिणामांना तोंड द्यायची तयारी असते. अर्थात आपण करतोय ते चुकीचं किंवा इतरांना हार्मफुल नाही याची खात्री असते तेव्हाच!

दिनेशदा, मिथुन रास मणजे एका दगडात दोन पक्षी मारणे, एकाच्वेळी दोन्ही डगरींवर हात ठेवणे टाईप असते ना..? असे वाचले होते.
मिथुन माझ्या चुलत भावाची रास आहे, एखाद्या गोष्टीला वाढवून चढवून सांगणे, प्रसंगी थाप मारणे अशा स्वभावाचा आहे तो.. त्याच्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे, आर्थिक व्यवहारही फारसे स्वच्छ नाहीत..
गरज सरो वैद्य मरो टाईप आहे..

बागे, इथे पण सेम पिंच गं. खूप अ‍ॅनालिसिस करत बसायला आवडत नाही.
>>>>>>>>>>>>>>>>>>

बागेश्री आणि निंबुडा तुम्ही "अ‍ॅनॅलिसीस करत नाही Uhoh मग तुमच्या कविता, ललितांमध्ये काय असतं नक्की Biggrin Light 1

मिथुन रास मणजे एका दगडात दोन पक्षी मारणे, एकाच्वेळी दोन्ही डगरींवर हात ठेवणे टाईप असते ना..? असे वाचले होते, माझ्या चुलत भावाची रास आहे ती, एखाद्या गोष्टीला वाढवून चढवून सांगणे प्रसंगी थाप मारणे अश्या स्ववभावाचा आहे तो.. त्याच्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे, आर्थिक व्यवहारही फारसे स्वच्छ नाहीत..
गरज सरो वैद्य मरो टाईप आहे.>>>>>> काहीतरी गडबड होतेय मिथुन रास अशी नसतेच

मिथुन - बडबडे, बुद्धिमान, पण अतिशय उपरोधिक/धारदार्/वर्मी लागेल असे बोलण्यात पटाईत >>>>> हे पटतय पण खरे बोलणारी रास आहे. मी स्वत:

मग तुमच्या कविता, ललितांमध्ये काय असतं नक्की >>>
आत्मग्लानी आल्यानंतर मनात विचाररुपी जी खळबळ माजते त्याचे शब्दांत रुपांतर करण्याच्या आमच्या कौशल्यास अ‍ॅनालिसिस म्हणणे म्हणजे आम्ही निर्माण केलेल्या साहित्याचा घोर अपमान आहे, असे आपणास वाटत नाही का, भुंगोजीराव??

Uhoh बाप्रे, दम लागला इतका मोठ्ठा प्रश्न टाईप करताना! :हुश्श:

थोडीशी रिस्क उचलायची आणि परिणामांना तोंड द्यायची तयारी असते. >> अगदी, स्व-जबाबदारीवरचे निर्णय Happy

मग तुमच्या कविता, ललितांमध्ये काय असतं नक्की >> भुंग्या, तुझी रास कोणती रे?
>>>>>>>>>>>>>>>

बागे, तू काय फक्त स्वतःचे लिहिलेले प्रतिसाद वाचतेस...... वर एवढी डिटेल्ड माहिती दिलिये झंपीने .... ती वाच.

मिथुन म्हणजे फार आकर्षक व्यक्तीमत्व. त्यांच्याकडे दुर्लक्ष करताच येत नाही. रुसावं आणि आग्रह करावा तर त्यांनीच.

मिथुन म्हणजे फार आकर्षक व्यक्तीमत्व. त्यांच्याकडे दुर्लक्ष करताच येत नाही. रुसावं आणि आग्रह करावा तर त्यांनीच.
>>>>>>>>>>>>>>>>

ओ नाही हो दिनेशदा....... दोन मिथुन राशीच्या व्यक्ती आठवल्या..... असं नसतं हो Proud

वृषभ रास- रोहिणी नक्षत्र, कर्क रास- पुष्य नक्षत्र, वृश्चिक रास- अनुराधा नक्षत्र, मकर रास- श्रवण नक्षत्र! उत्तम कॉम्बिनेशन!

Pages