सुंठ वडी..

Submitted by सुलेखा on 1 January, 2012 - 07:09
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१०० ग्राम-- सुंठ पुड..
२०० ग्राम पिठी साखर ..
१०० ग्राम अंदाजे --साजुक तुप्..शक्यतो घरी केलेले घ्यावे..

क्रमवार पाककृती: 

तुप पातळ करुन घ्यावे..
चमचाभर पिठी साखर वगळावी..
एका ताटलीला तुपाचा हात फिरवुन वरुन वगळलेली पिठी साखर भुरभुरावी..
एका लहान पातेलीत सुंठ पुड व साखर चमच्याने एक्त्र करुन घ्यावी..
आता वरुन पातळ केलेले तुप थोडे-थोडे ओतावे..घट्टसर गोळा होईपर्यंत ढवळत रहावे..
तयार गोळा तुप लावलेल्या ताटलीत थापावा..
बोटाच्या एक पेराएवढ्या लहान लहान वड्या पाडाव्या..
रोज सकाळी एक वडी खावी ..थंडीपासुन रक्षण होते..

वाढणी/प्रमाण: 
रोज प्रत्येकी फक्त एक्च खावी..
अधिक टिपा: 

इथे सुंठ पुड तयार लिहीली आहे..पण घरी केलेली असली तर स्वाद,वास,गुण खुपच छान येतो..
बाजारातुन दुधीया सुंठ आणावी.याची ओळख म्हणजे ही पांढरी असुन ,फुगरी-फुगरी म्हणजेच फुगलेली असते..आतुन फोसरी/हलकी असते..
ही सुंठ फोडणे थोडेसे जिकीरीचे काम आहे..पण बत्ता/दगड्/अडकित्ता वापरुन लहान तुकडे [१ चे ४]करुन घ्यावे..मिक्सर मधुन बारीक वाटुन चाळुन घ्यावी..ही पुड वापरावी ..वरचे चाळण [रेषाळ भाग्]चहा करताना वापरावा..

माहितीचा स्रोत: 
माझी आई..
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

छान! दुधिया सुंठीच्या माहितीबद्दल धन्स! दुकानच्या सुंठपुडीला तिखटपणा नसतो असे अनुभवास आले.

खूप दिवस झाले सुंठवडा खाऊन. आजोबा असताना त्यांच्यासाठी दर हिवाळ्यात बनवायची आजी. आणि वाड्यांऐवजी त्याच्या बोराएवढ्या गोळ्या बनवायची. प्रत्येक वेळी देताना 'एकच खा' असे संगायची पण मग अजून एक अजून एक असे करत मी ३-४ तरी वसूल करायचो.

आणि त्यानंतर रामनवमीला देवळात प्रसादाला मिळणारा सुंठवडाही तेवढाच मस्त लागायचा.

परिणिता,
आलेपाकाची चव वेगळी असते..जास्त तिखट लागते..
माधव,सुंठवडा ही तिखट लागतो..त्यात गुळ ही घालतात..
ताजे आले किसुन सुण्ठवडा करतात.तर आलेपाक आले किसुन वाटुन दुधात शिजवुन करतात..
वर लिहीलेली सुंठवडी टिकाऊ तर आहेच..तुपाचे प्रमाण जास्त झाले किंवा साखरे मुळे ही मिश्रण सैलसर झाले तर मऊसर वडी पाडता येत नाही ..अशा वेळी लहान लहान गोल गोळ्या कराव्या लागतात..सुंठ तिखट लागु नये म्हणुनच त्यात दुप्पट साखर घातलेली असते..त्यामुळे ही वडी तोंडात ठेवली कि विरघळते..

परवाच या सुंठवडीची वेगळी आवृत्ती घरी केली होती. सुंठवडी म्हणून करायला घेतली, पण त्यात जरा अंमळ थोडी साय आणि बदामाची पूड घातली!! Proud फारच पौष्टिक झाली.... थोडी खाण्याऐवजी समस्त उपस्थित मंडळींनी जातायेता हादडली!!