जिंदगीचा स्पर्श होता मार्ग झाले वाकडे

जिंदगीचा स्पर्श होता मार्ग झाले वाकडे

Submitted by जागो मोहन प्यारे on 10 May, 2012 - 05:57

धावत्याला जोश येई आणि रस्ता सापडे
पण दुतर्फा बोचकरण्या का उभी ही माकडे

दाबिता कळ काम होई अंगवळणी हे पडे
दहनही माझे विजेवर ना चिता ना लाकडे

काल बापू आज साई रोज बाबा वेगळा
पावला कोणीच नाही घालता मी साकडे

जन्म होता वासुनी आ श्वास पहिला घेतला
जिंदगीचा स्पर्श होता मार्ग झाले वाकडे

वासनांचा खेळ सारा या इथे अन त्या तिथे
शुष्क चाफा मज मनाचा व्यर्थ फुलण्या धडपडे

गुलमोहर: 
Subscribe to RSS - जिंदगीचा स्पर्श होता   मार्ग  झाले वाकडे