संगिनी

आर्त

Submitted by sagarlahari on 19 April, 2012 - 15:00

चांदव्याचे प्रीत गाणे
ऐकता नभ रंगते |
कुणी येथे विरहिणी अन
वाट त्याची पाहते || ....

क्षितीज पार सांज धून
सूर अनवट छेडते |
अंतरात कुणी माझ्या
जीव गोंदून ठेवते ||

आर्त माझ्या मन्मनीचे
सख्या तुला समजेल का |
विरह व्याकूळ वेदनेचा
अर्थ तुज उमगेल का ||

सांडते घरदार मागे
सोडते जनरीत ही |
अंतरीची संगिनी मज
सांग तू करशील का ||
--सागर लहरी

गुलमोहर: 
Subscribe to RSS - संगिनी