आनिल तापकीर

श्रद्धा अंधश्रद्धा १ते ५ भाग एकत्र

Submitted by अनिल तापकीर on 7 March, 2012 - 09:21

वेळ रात्री बारा सव्वा बाराची, नदीकाठचा परिसर, डोळ्यात कुणी बोट घातले तरी कळणार नाही असा दाट अंधार,अमावाश्येचीच रात्र ती. सगळीकडे काळोखाचेच साम्राज्य,दूर गावाच्या बाजूला ग्राम पंचायतीचे दोन तीन दिवे क्षीणपणे लुकलुकताना दिसत होते.परंतु इथे स्मशानात त्यांचा काहीही उपयोग नव्हता. इथे त्याला फक्त अंधार नि अस्वस्थ करणारी शांतता यांचीच सोबत होती. .

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

श्रद्धा अंधश्रद्धा भाग 6

Submitted by अनिल तापकीर on 6 March, 2012 - 06:28

शहरात चांगले पाच दिवस उपचार घेऊनही काही फरक न पडल्यामुळे सदाला घेऊन दिनकरराव व श्यामराव परत गावाला आले. नि देवरुशी, भगत , मांत्रिक यांचे उंबरे झिजवू लागले. सगळ्यांनी आपापल्या परीने चांगला पैसा उकळला परंतु सदाला चांगला बरा कोणीच करू शकले नाही. पैसा जाऊनही पोरगं बरं झालं नाही म्हणून सदाचे चुलता व वडील दोघेही हताश झाले. त्यांना काय करावे ते समझेना.
वडील व चूलत्यानंतर सदाची काळजी वाटणारे होते ते म्हणजे सदाचे गावातील मित्र

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

आता तरी देवा

Submitted by अनिल तापकीर on 20 February, 2012 - 00:45

आता तरी देवा आम्हा पावशील का?
महागाईला आळा तू घालशील का?
दिवसेंदिवस हि वाढतच जाई |
जगामध्ये हिला कोणी रोखणारा नाही |
तू तरी हिला आता रोखशील का?
महागाईला आळा तू घालशील का?
गरीब श्रीमंतातली दरी वाढतच जाई |
पुढारी खिसे भरण्यात मग्न होई |
याच्यासाठी काहीतरी करशील का?
महागाईला आळा तू घालशील का?
पैसेवाले रोज करतात मजा |
गरिबांसाठी संसार, आहे एक सजा |
गरीबांचा वाली तू होशील का?
महागाईला आळा तू घालशील का?
रोज होत आहे नवीन घोटाळे |
गरिबांचे निघते आहे रोज दिवाळे |
त्यांच्यासाठी रोज दिवाळी आणशील का?
महागाईला आळा तू घालशील का?
महागाईचा असा चालला आहे खेळ |

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - आनिल तापकीर