निरा

शुद्ध निरा (फोटोसकट)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 February, 2012 - 01:52

नारळाचे झाड म्हणजे कल्पतरूच. त्याच्या पात्या, खोड, नारळ, त्याचे साल, करवंटी अगदी सगळ्याचाच वापर करता येतो. नारळ पाणी म्हणजे तर अमृतासारखेच. नारळाची उंच ऐटदार झाडे कोकण किनार पट्टीवर दाटीवाटीने मिरवताना दिसतात त्यामुळे कोकण किनारपट्टीवर बर्‍याच लोकांचे नारळ व नारळाच्या झाडापासून मिळणार्‍या इतर उत्पन्नांवर उपजीवीका चालते. नारळाच्या झाडाच्या पात्यांतील काड्यांपासून झाडू तयार होतो. झावळ्यांपासून चटई प्रमाणे झाप तयार करतात, नारळाच्या खोडाचा पुलासाठी उपयोग होतो. ही सगळी माहीती आपण अभ्यासक्रमात शिकतच असतो. पण नारळाच्या झाडापासून अजुन एक उत्पन्न्/पेय निघते ते म्हणजे निरा.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - निरा