जन गण मन चित्रपट: प्रथम प्रदर्शन सोहळा, पुणे
Submitted by मंदार-जोशी on 27 January, 2012 - 07:55
जन गण मन हा नवीन मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे हे मायबोली.कॉमवर वाचल्यावर माझ्या नेहमीच्या "टी.व्ही.वर आल्यावर बघू" ह्या ब्रीदवाक्याचा जप मनात करत पुन्श्च कामात डोकं घालणार इतक्यात अनपेक्षितपणे चिन्मयचा (चिनुक्स) फोन आला की "जन गण मनच्या प्रिमिअरची मायबोलीला पाच तिकिटं मिळत आहेत, जाणार का?" मागच्या वेळी असाच एक चित्रपट बघण्याची संधी गमावल्याने या वेळी काहीही करुन जमवायचंच असा विचार केला, आणि माणशी एकच तिकीट मिळणार असल्याने गृहमंत्र्यांना भरपूर मस्का लावून चिन्मयला होकार कळवला.
विषय: