पं. कुमार गंधर्व

"आनंद मना ... "

Submitted by अवल on 6 December, 2012 - 00:46

आज कोण कुठले आप्त मला भेटायला सकाळी सकाळी आले.
उठलेच ते काहीशी वेगळ्या मूड मध्ये. आज पर्यंतच्या अनेक त्रासदायक आठवणी उगाचच आठवू लागल्या.

आयुष्यात न आकारलेले आकार, डोळ्यासमोर फेर धरू लागले.उगाचच एक अस्वस्थता तार छेडू लागली. जे जे हाती आले नव्हते, कधी निसटले होते, कधी सोडावे लागले होते, कधी मनापासूनही सोडले होते; ते सगळे भोवती फेर धरून वाकुल्या दाखवत होते.

तशीच सारी कामे करत होते, अन उगाचच खंतावर होते, चिडचिडत होते...

अगदी नवरा, मुलगा दोघांशीही त्रासिक सूर छेडत होते,... अन असंच काही काही....

विषय: 

निर्गुण भजनांचे तरंग, अंतरंगात पोचवणारा फकीर - पं. कुमार गंधर्व

Submitted by किंकर on 11 January, 2012 - 23:16

मी पुणेकर आहे. पुण्याच्या वास्तव्यात बारा पंधरा वर्षे नियमितपणे सवाई गंधर्व मैफिल जागवणारा. जेंव्हा पुण्याच्या गुलाबी थंडीत रथी-महारथींच्या स्वर्गीय सुरावटींच्या सागरात अक्षरशः डुंबत मैफिल जागवणे हेच त्या मैफिलीचे वैशिष्ट्य होते तो काळ अनुभवला आहे. असे असूनही मी मोकळेपणाने सांगतो की शास्त्रीय संगीतात मला काही कळत नाही. पण मैफिलीत दाद देण्याची जी जागा असते ना ती मात्र कधीच चुकली नाही. आणि ते का झाले सांगू? जेंव्हा गाणे ऐकायला जायचे, तेंव्हा ते कानात पंचप्राण एकवटून ऐकायचे इतकेच माहित होते.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - पं. कुमार गंधर्व