Khusrow

श्रावण आला, ग आई - Amir Khusrow - The spring has arrived

Submitted by सुसुकु on 7 December, 2011 - 17:29

श्रावण आला, ग आई, श्रावण आला, आई, श्रावण आला ग, श्रावण आला |
श्रावण आला मुली, ग श्रावण आला, मुली, श्रावण आला ग, श्रावण आला ||

माझ्या बाबांना पाठव ना आई, ग श्रावण आला
बाबा आता थकले ग मुली, जरी श्रावण आला ।

भावाला तरी पाठव ना आई, ग श्रावण आला
भाऊ अजूनही लहानच ग मुली, जरी श्रावण आला ।

मग मामाला तरी पाठव ना, ग श्रावण आला
मामा तर साधाभोळा ग मुली, जरी श्रावण आला ।

माझे बालपण तर दे ना आई, ग श्रावण आला
बालपण तुझे विरले ग वेडे, जरी श्रावण आला ।

Translated from the original poem written by Amir Khusrow -

Amman meray baba ko bhaijo ri - Ke saavan ayaa

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - Khusrow