हतबल ती
गोंदण गोंदवणारी ती युवती
जर्मनीतून इस्राएली आली होती
कलाकारच ती जोपासले हुनर तीने
भरायाची रंग चित्रात निगुतीने
कुठे कुणाची प्रीत चितारत
रंगवले त्यातले हळवेपण
कुठे रंगले वीरांचे रणकंदन
तर कुठे प्रेषीतांचे दयाळूपण
कुठे रानपाखंरांचे कुजन
कुठे वृक्षवेलींचे वर्षा वन
असीच सारी शरीरे लेपत
मनात आनंद गोदंणं गोंदत
सुंदर माणसांचे, सुंदर विश्व
तिला जगाया होते खुणावत
संगीत सोहळा अनुभवायला
आली होती ती इस्राएलला
अनभिज्ञ ती मरणा बद्दल
तसे ते नसते ठाऊक कुणाला
कण न कण
इतका त्रास देतात गेलेल्या माणसाच्या आठवणी
जितका दिलेला नसतो त्यानं जिवंतपणी
उभ्या जन्माचं वैर मांडतात त्यापण
हतबल होऊन जातो जिण्याचा कण न कण
आता हेच पहा ना
अमरचा कपाटात ठेवलेला शर्ट त्याच्या भावानं लंडनहून पाठवलेला
तोच तो, वरच दिसतोय ना
हो, तो त्याला तोकडा झाला
अमर म्हणाला
हे तर आव्हान मला बारीक व्हायला
ठेव हा शर्ट कपाटात सर्वात वर
घालीन मी लवकरच बारीक झाल्यावर
त्यासाठी आजपासून मी डायटवर.
कसलं काय आणि कसलं काय
अमर कुठला बारीक व्हायला
शर्ट तिथं तसाच -हायला
अमरची आठवण मनी दाटते
तेव्हा कधीमधी मी शर्टलाच थोपटते
असेच थोपटताना