लमाण
Submitted by सन्जोप राव on 23 November, 2011 - 19:58
श्रीराम लागू यांचे नाव हल्लीच मराठी संकेतस्थळावरील एका चर्चेत आले. तेही मी त्यांचे नास्तिकतेचे उदाहरण दिले म्हणून. नास्तिकतेची इतर अनेक उदाहरणे असताना मला लागूंचेच नाव सुचावे याचे कारण म्हणजे गेले काही दिवस मी वाचत असलेले 'लमाण' हे पुस्तक. हे पुस्तक मी अगदी प्रकाशित झाल्याझाल्या २००४-०५ च्या सुमारास पहिल्यांदा वाचले होते. लागूंची दरम्यान असलेली ओळख म्हणजे मराठी चित्रपटांत अप्रतिम अभिनय करणारा ( 'सामना', 'सिंहासन', 'पारध' ) आणि हिंदीत पाट्या टाकणारा ( 'हेराफेरी' (जुना) या चित्रपटातला त्यांचा वेड्याचे सोंग घेतलेला आणि अमिताभ बच्चन-विनोद खन्नाला अत्यंत नाटकीपणे 'क्यूं मिस्टर एम.ए.एल. एल.
शब्दखुणा: