चंद्रमा

धर्म

Submitted by तो मी नव्हेच on 30 July, 2020 - 05:07

नभी भास्कराचे तेज लागे सौम्य पसराया
पैलतिरीचा चंद्रमा जाई हळूच निजाया

चाले अनादि अनंत पाठशिवणीचा खेळ
त्यांना ग्रहणाचा शाप जेव्हा मिळते भेटाया

तरीही ना होते कमी मनी माया भावंडांची
ज्येष्ठ सूर्याच्या तेजाने लागे चंद्र उजळाया

दोघे धर्मास जागती नातीगोती विसरून
परि भाचरांचे प्रेम कारण जीवन फुलाया

द्यावा आशिर्वाद आम्हा सदा धर्म पाळण्याचा
लाभो मती भाचरांना अर्थ जन्माचा कळाया

- रोहन

Subscribe to RSS - चंद्रमा