ऊर्जेचे अंतरंग-१७: किरणोत्सार

ऊर्जेचे अंतरंग-१७: किरणोत्सार, विश्वकिरणे आणि मूलकीकरण

Submitted by नरेंद्र गोळे on 31 October, 2011 - 08:35

कोणत्याही पदार्थातून उत्स्फूर्तपणे निघणार्‍या ऊर्जेला किंवा कणांना उत्सर्जन म्हणतात. किरणोत्सारी पदार्थांमुळे होणारे उत्सर्जन प्रामुख्याने ३ प्रकारचे असते. अल्फा, बीटा आणि गॅमा. ह्या उत्सर्जनास अणुकेंद्रकीय उत्सर्जन म्हणतात. कारण ते अणूंच्या गर्भातून उगम पावत असते. अल्फा कण म्हणजे हेलियमचे अणुकेंद्रक (nucleus) असते, तर बीटा कण म्हणजे ऋणक किंवा विजक (electron) असतात. काही जड अणू विद्युतभार रहित कण उत्सर्जित करतात, ते म्हणजे विरक्तक (neutrons) असतात.

Subscribe to RSS - ऊर्जेचे अंतरंग-१७: किरणोत्सार