Apple

न्यूटनच रहस्य

Submitted by vasant_20 on 21 July, 2015 - 02:23

न्यूटन बर झाल असत जर
नसती शोधलीस तू गतीची समीकरणं
राहील असत कदाचित
आमच्यात थोडस जड़त्व
पण एक्शन नसताना
येणाऱ्या रिएक्शन थांबल्या असत्या
नसतो धावलो सैरावैरा
उगाचच इकडे तिकडे
संवेगही एकमेकांचा
एकमेकांवर आदळला नसता
न्यूटन, वरतुन पडलेल्या
सफरचंदाने तुला सांगितल
गुरुत्वाकर्षणाच रहस्य
पण मला वाटत कदाचित
एक रहस्य लपवलस तू
पडलेल्या सफरचंदाने तू
पोटाच समीकरण आधी
सोडवल होतस..!

शब्दखुणा: 

आय फॉर आयफोन...

Submitted by सावली on 6 October, 2011 - 21:51

आय फॉर आयफोन

स्टीव्हन पॉल जॉब्स, एक कॉलेज शिक्षण अर्धवट सोडलेला हिप्पी आयुष्य जगणारा मुलगा तंत्रज्ञानाच्या विश्वात इतकी उलथापालथ घडवेल असा कुणी त्यावेळी विचारही केला नसावा. वयाच्या १९व्या वर्षी स्वतःच्या शोधात भारतात आलेल्या आणि 'निम करोली' बाबाच्या आश्रमात राहिलेल्या स्टीव्हने इथून काय नेलं ते त्याचं त्याला माहित! पण त्याची ही वाक्यं मात्र खूप काही सांगून जातात.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - Apple