वाव
Submitted by निखिल मोडक on 11 May, 2023 - 05:17
कुठेही न मजला आता ठाव आहे
जरी ओळखीचा पुरा गाव आहे
पुन्हा लाविले मी पणाला स्वतःला
जरी हारलेला जुना डाव आहे
पुन्हा पावलो मी अश्या ह्या ठिकाणा
जिथे कोरडी भुकी बाव आहे
आताशा दुजाला दिला सात बारा
जरी लागलेले तुझे नांव आहे
हासलो पुन्हा मी सखे आठवोनी
माझ्या प्रती जो तुझा भाव आहे
पुन्हा संपले पुण्य देऊन सारे
शिव्याशाप घेण्या पुन्हा वाव आहे
©निखिल मोडक
विषय: