अचाट

परदेस - अनकट व्हर्जन

Submitted by फारएण्ड on 15 August, 2010 - 23:24

भारत व अमेरिका या दोन्ही संस्कृतींमधल्या फरकांची ही कहाणी आहे. अमरिश पुरी ३५ वर्षे अमेरिकेत राहून भारतात येतो व आपल्या अमेरिकन मुलासाठी भारतीय सून पसंत करतो. मग त्यातून होणार्‍या संघर्षाची, किंवा खरे म्हणजे घातलेल्या अनावश्यक घोळाची ही कथा आहे. ३५ वर्षे अमेरिकेत राहून अमरिश पुरीला दोन्ही संस्कृतींची किती चांगली समज आहे हे स्टार्टलाच कळते. आपल्या बरोबर आलेल्या इतर अमेरिकन टुरिस्टांना "In America, love is give-and-take. But in India loving is only giving, giving, giving" असे तो सांगतो.

विषय: 

कातिलों के कातिल

Submitted by श्रद्धा on 14 October, 2009 - 11:04

'कातिलों के कातिल' हे अ नि अ सिनेम्यांच्या इतिहासातले एक गौरवशाली पान आहे. अशा सिनेम्याची निर्मिती केल्याबद्दल हिंगोरानी बंधूंना दंडवत घालून हे पुराण पुढे सुरू करते.

प्रदीप कुमार आणि निरुपा रॉय हे एक सद्गुणी, श्रीमंत, दोन मुले असलेले जोडपे. त्यांच्याकडे एक रथ असतो. रथामुळेच सिनेमा घडतो म्हणजे रथाची किंमत आकारमानाच्या व्यस्त प्रमाणात असणे ओघाने आलेच. छोट्या पाटाइतका परीघ असलेला आणि घरी बसवायच्या गणपतीच्या मूर्तीएवढ्या उंचीचा रथ 'करोडों का' असतो.

विषय: 

नजराना

Submitted by श्रद्धा on 8 May, 2009 - 11:47

राजेश खन्ना याच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली असताना त्याने हा सिनेमा केल्यासारखे वाटते.

विषय: 

अचाट आणि अतर्क्य गाणी

Submitted by slarti on 16 April, 2009 - 08:46

अ आणि अ गाण्यांसाठी हा बाफ. इथे गाण्याबद्दल सांगताना शक्यतो चित्रफितीचा दुवा द्या आणि दुवा घ्या.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - अचाट