ती फुलराणी - बालकवी

ती फुलराणी

Submitted by प्रसन्न राजाध्यक्ष on 30 August, 2011 - 04:31

हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे ,
त्या सुंदर मखमालीवरती फुलराणीही खेळत होती.
गोड निळ्या वातावरणात, अव्याज मानाने होती डोलत,
प्रनय चंचला त्या भृ लीला अवगत नव्हत्या कुमारिकेला.
आईच्या मांडीवर बसुनी झोके घ्यावे , गावी गाणी ,
याहुनी ठावे काय तियेला, साध्या भोळ्या फुलराणीला?

पुरा विनोदी संध्यावात डोल डोलवी हिरवे शेत,
तोच एकदा हसत आला चुंबून म्हणे फुलराणीला -
"छानी माझी सोनुकली ती कुणाकडे ग पाहत होती ?
कोण बरे त्या संध्येतून हळूच पाहते डोकावून ?
तो रविकर का गोजिरवाणा आवडला आमुच्या फुलराणीला ?"

गुलमोहर: 
Subscribe to RSS - ती फुलराणी - बालकवी