ईश्वर....
Submitted by माणक्या on 28 July, 2011 - 11:22
ऐकलेल्या शब्दाच्या अर्थगर्भातून येणारे हुंकार
वाचलेल्यातून मनावर निर्माण होणारी नि:शब्द वलयं
सगळं सगळं एकवटून मी वस्तुस्थिती चाचपतो
तेंव्हा हाती लागतात फक्त लक्तरं.. कळलेपणाची!
आपलं वाटणं अन कळणं किती फोल असू शकतं.. पुरावा!
तुम्हाला कशाचाही पुर्ण अंदाज येऊ नये ह्याची पुरेपुर सोय आहे ईथे
तूच आहेस तूझ्या जीवनाचा शिल्पकार हे खरंय,
फक्त छन्नी मारल्यावर कसा, कधी अन कुठे टवका उडेल ते विचारु नकोस.
अविरत चालू असलेलं कालचक्र एकच शाश्वत, बाकी
प्रचंड विश्वशक्तीपुढे एवढ्याश्या एका जीवाची शाश्वती कोण देणार?
माणूस ज्ञानाने घडतो हे जरी खरं असलं तरी,
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा