ऐकलेल्या शब्दाच्या अर्थगर्भातून येणारे हुंकार
वाचलेल्यातून मनावर निर्माण होणारी नि:शब्द वलयं
सगळं सगळं एकवटून मी वस्तुस्थिती चाचपतो
तेंव्हा हाती लागतात फक्त लक्तरं.. कळलेपणाची!
आपलं वाटणं अन कळणं किती फोल असू शकतं.. पुरावा!
तुम्हाला कशाचाही पुर्ण अंदाज येऊ नये ह्याची पुरेपुर सोय आहे ईथे
तूच आहेस तूझ्या जीवनाचा शिल्पकार हे खरंय,
फक्त छन्नी मारल्यावर कसा, कधी अन कुठे टवका उडेल ते विचारु नकोस.
अविरत चालू असलेलं कालचक्र एकच शाश्वत, बाकी
प्रचंड विश्वशक्तीपुढे एवढ्याश्या एका जीवाची शाश्वती कोण देणार?
माणूस ज्ञानाने घडतो हे जरी खरं असलं तरी,
शहाणा मात्र तो फक्त अन फक्त अनुभवानेच होतो.. असं म्हणतात
एकंदरीत काय तर सगळं वाचलं ऐकल्यावर एकच कळलं
त्याने फक्त तुम्हाला नेमकं शब्दात तुमचं म्हणणं मांडतं येतं.. बाकी काहीही नाही
हवं ते जीवनात मिळवण्याचा ठोस मार्ग कोणता?
प्रयत्न करा! प्रामाणिक प्रयत्नानांना यश असतंच.. अपयश आलं तर? नशिब!
शेवटी काय तर नक्की काहीही सांगता येत नाही
सगळ्या बेरजा वजाबाक्या बरोबर आल्या अंकगणिताच्या तरी संचित कोणास ठाऊक
कर्मफळाच्या सिद्धांताला सरळ तडा देत वास्तव जेंव्हा छाताडावर बसतं,
तेंव्हा विश्वासाच्या अंतिम टोकावर फक्त तुम्हीच तुमचा ईश्वर असता.. तो ढगातला निनावी नव्हे!
ईश्वर....
Submitted by माणक्या on 28 July, 2011 - 11:22
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
ग्रेट एक्स्प्रेशन .
ग्रेट एक्स्प्रेशन .
भान ठेवून योजना आखा आणि बेभान
भान ठेवून योजना आखा आणि बेभान होऊन राबवा.
सगळ्या बेरजा वजाबाक्या बरोबर आल्या अंकगणिताच्या तरी संचित कोणास ठाऊक
कर्मफळाच्या सिद्धांताला सरळ तडा देत वास्तव जेंव्हा छाताडावर बसतं,
तेंव्हा विश्वासाच्या अंतिम टोकावर फक्त तुम्हीच तुमचा ईश्वर असता.. तो ढगातला निनावी नव्हे!
निनावी...आपण त्याला खूप नाव दिली आहेत्,परंतू तो आहे इतक नक्की,छान आहे.
ग्रेट रे भावा ! किती
ग्रेट रे भावा !
किती दिवसानंतर दिसतोयस... आहेस कुठे?
छायाताईंशी सहमत.. सुट्या ओळीच
छायाताईंशी सहमत..
सुट्या ओळीच फार भारी झाल्या आहेत...
आभार दोस्तो! भावा... ईथेच
आभार दोस्तो!

भावा... ईथेच आहे, कुठे जाणार?
विभाग्रज..
आम्ही देवास मानतो
न मानतो ऐसे नव्हे
पण हे ही आम्ही मानतो
की तो आमचा कोणी नव्हे!
साभार.. वा. वा. पाटणकरांकडून!
ग्रेट अन वेगळी !! विचारात
ग्रेट अन वेगळी !! विचारात पाडलस..
खरतर यावर चर्चा घडेल अन प्रगल्भ माबोकरांना विचार मंथनातुन कळलेले जिवन सार ही सामोरे येइल असे वाटले कविता वाचताना..