बेरोजगारी

मंदीचा काळ आणि मुलाचं भावविश्व

Submitted by मोहना on 27 July, 2011 - 10:48

दर महिन्याला अमेरिकेतल्या बेरोजगारीचा वरखाली जाणारा दर दूरदर्शनवर सांगतात तेव्हा आशा निराशेच्या खेळात अडकायला होतं. त्या आकड्यामागे दडलेल्या चेहर्‍यांचा आणि संघर्षाचा विचार करायला भाग पाडतं. नजरेसमोर येतात पालकांबरोबर बेघर झालेली मुलं, दप्तराच्या ओझ्याबरोबर पालकांच्या केविलवाण्या परिस्थितीचं ओझं पाठीवर बाळगलेले कोवळे जीव. कुणाच्याही वाट्याला येऊ नये अशी वाटणारी ही परिस्थिती तसं म्हटलं तर प्रत्येकाच्या दारापाशी येऊन ठाकली होती. काही बचावले, काही होरपळून निघाले. ज्यानी नोकर्‍या गमावल्या त्यांना आकडेवारीच्या फसव्या मुखवट्यांनी बेचैन व्हायला होतं.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - बेरोजगारी