जलदुर्ग ३ - सामराजगड आणि रेवदंडा.
Submitted by हेम on 4 June, 2011 - 14:46
कांसा बेटावरचा पद्मदुर्ग.. - http://www.maayboli.com/node/26001
पद्मदुर्ग आटोपून ११ च्या सुमारास राजपुरीतून निघालो. आता लक्ष्य सामराजगड होते. सामराजगड हा छोटासा दुर्ग मुरुड आणि राजपुरी यांच्यामध्ये असलेल्या एकदरा गांवाजवळ आहे. एकदरा गांवातले लोक किल्ला म्हटल्यावर नीट माहिती देईनात. एकदरा गांवातल्या शिव मंदिराजवळ गेल्यावर मुरुड समुद्रकिनार्याचा सुंदर देखावा दिसतो.

विषय: