अन्नपुर्णा

अन्नपुर्णा आणि अण्णा-२ (वसंत शिंदे)

Submitted by शाली on 20 May, 2018 - 22:28

आता ‘सातो दिन भगवानके, क्या मंगल क्या पीर’ असं असलं तरी कॉलेजच्या काळात शुक्रवारी संध्याकाळीच ‘रविवार’ चढायला लागायचा. आणि त्याचा हॅंगओव्हर मंगळवारपर्यंत टिकायचा. (वेगळा अर्थ काढू नका.) यादीच फार मोठी असे. रद्दीची दुकाने पालथी घालणे, पेपरची कात्रणे काढणे, अप्पा बळवंतला जावून ऊगाचंच पुस्तकांच्या दुकानात पुस्तके चाळणे, मित्राच्या रुमवर तबला-पेटी घेऊन मैफील रंगवणे. (कुणी काही म्हणो, आम्ही तिला मैफीलच म्हणायचो) शंकरच्या स्टुडीओत जावून मातीशी खेळणे असल्या अनेक भानगडी असायच्या. त्यामुळे कॉलेजच्या कामासाठी खऱ्या अर्थाने दोनच दिवस मिळायचे. बुधवार आणि गुरुवार. रविवारी जाग यायची तिच पसाऱ्यात.

विषय: 

अन्नपुर्णा आणि अण्णा-१ (वसंत शिंदे)

Submitted by शाली on 19 May, 2018 - 20:21

साल आठवत नाही. कॉलेजचे दिवस होते ईतकं सांगीतलं तरी पुरेसं होईल. 'ईंजीनिअर’ केलं की पोराचं आयुष्य मार्गी लागतं, आणि बोर्डींगला किंवा होस्टेलला पोरगं ठेवलं की त्याला शिस्त लागते असं आई-बापांना वाटायचा काळ होता तो. आई-बापही भाबडे होते त्या काळी. त्या मुळे आमची रवानगी सहाजीकच ईंजीनिअरींगला आणि बाड-बिस्तरा होस्टेलला जाऊन पडला. गाव, शाळा सुटलेली. शहर, कॉलेजची ओळख नाही. त्या मुळे सुरवातीच्या दिवसात कॉलेजच्या आवारात आणि सुट्टीच्या दिवशी पुण्याच्या अनोळखी रस्त्यांवरुन 'मोरोबा’सारखा चेहऱा करुन निरर्थक भटकायचो. मोरोबा म्हणजे आमचा घरगडी. निव्वळ शुंभ.

विषय: 
Subscribe to RSS - अन्नपुर्णा