मी माझा

मी माझा कॅमेरा आणि धम्माल.

Submitted by मनीष कदम on 2 November, 2012 - 03:37

हि सगळी प्रकाशचित्रे एका क्लिक वर काढली आहेत आणि इफक्ट साठी कोणत्याही प्रकारच्या सॉफ्टवेअरचा किंवा डबल क्लिक चा वापर केला गेलेला नाही ( फक्त croping साठी photoshop चा वापर केला आहे) व माझ्या मदतीला माझ्या व्यतिरीक्त कोणिही नव्हत.

१
slaow1 (35).jpg

२
slaow1 (34).jpg

३
slaow1 (33).jpg

४

शब्दखुणा: 

मी माझा..

Submitted by निवडुंग on 27 March, 2011 - 13:38

बहरूनी ऋतू गुलाबी
आज तरळत गेलो..
मी माझा एकटाच
नकळत वठत गेलो..

काय मागितलं होतं?
आणि काय पडलं दान?
मी माझा एकटाच
जिंकूनी हरत गेलो..

बेवारस या मढ्यात
उगाचंच फुंकीत प्राण..
मी माझा एकटाच
लचके तोडीत गेलो..

फुका आशा ही कशाची?
आजवर गोंजारत राहिलो?
मी माझा एकटाच
रोज मन मारीत गेलो..

फाटकीच झोळी माझी
कधी न भरणारी..
मी माझा एकटाच
तरीही भीक मागत गेलो..

काल होतं हे कुणाचं
उद्याला कुठे कशाचं..
मी माझा एकटाच
उभा जळत गेलो..

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - मी माझा