माझ्यासाठी नव निर्मिती.

Submitted by किंकर on 27 March, 2011 - 11:57

आज बसलो लिहायला कविता, लेखणीत भरली ठासून शाई
जुळवण्यासाठी यमक, कानामात्रे शोधताना,वेलांटीच उलटी होई
आठवेनात नवीन शब्द,सुचेनात काहीच विचार
अकार उकार हवेत कोणाला,नुसतेच मारू रफार
मग पुन्हा पुन्हा उचलले,भोवतीचे कागदांचे बोळे
कडव्याच्या जुळवा जुळवी साठी ,फिरवले त्यावरून डोळे
ताल नाही सूर नाही, नाहीत अलंकार,अनुप्रास
त्यासाठी सुचावे लागते,आतूनच विनासायास
आडातच काही नाही,तर येईल कसे पोहर्‍यात
छंद बद्ध झाली नाही तरी,मीच माझ्या तोर्‍यात
अशी हि माझी कविता,मीच पुन्हा पुन्हा वाचून पाही
माझ्यासाठी नव निर्मिती, बाकी म्हणती काहीच्या काही

शब्दखुणा: 

उल्हासजी, दक्षिणाजी,
नमस्कार!
काहीच्या काही प्रयत्नास दाद दिलीत त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद!