ऑरिगाता- कागदी फुले-ज्वेलरी बॉक्स आणि फोटो फ्रेम.

Submitted by प्रज्ञा९ on 29 March, 2011 - 11:51

IMG_4619.JPGमी सध्या ऑरिगाता ही जपानी कला शिकतेय. ऑरिगाता हे ओरिगामी पेक्षा पूर्ण वेगळं आहे!

यात क्रेप पेपर्स चुण्या करून धुवून, ३-४ तास वाळवून, फेविकॉलने चिकटवतात. असे चिकटवल्यावर कागदाची जाडी आणि पर्यायाने स्ट्रेंथ वाढते. मग या कागदाची फुलं, पानं कापून त्या कापलेल्या आकारांना पीळ द्यायचा आणि २४ तास ती तशीच ठेवायची. दुसर्‍या दिवशी सगळे पीळ सोडवून थोडा आकार द्यायचा आणि मग फुलं, पानं वगैरे चिकटवायची.

मी ही सगळी प्रक्रिया खूपच थोडक्यात सांगितली आहे. या प्रकारच्या फुलांनी मी एक ज्वेलरी बॉक्स सजवला, त्याचं हे प्रचि.

प्रक्रिया करताना फोटो नाही काढले, पण पुढच्या वेळी नवीन काही सजावट करेन तेव्हा टाकेन इथे फोटो. Happy

ही फ्रेम. Happy कालच केली. आधीच सगळं मटेरिअल तयार होतं, आता नवीन कागद आणले की स्टेप बाय स्टेप देइन. यात लावायला माझ्याकडे फोटो त्याच मापात नाहिये Sad
सगळे ४*६ आहेत.

गुलमोहर: 

प्रज्ञा छान बनवली आहेस फुलं....आवडली
ती लाल फुलं मस्त दिसत आहेत. त्यांचे पराग कण काय क्युट दिसतात. Happy

लोकहो, काही तांत्रिक अडचणींमुळे प्रचि थेट इथेच बघायची सोय देता येत नाहिये, क्षमस्व!
पण पुढच्या वेळी नवीन डेकोरेशन केल्यावर प्रचि थेट इथेच दिसतील असं करेन. Happy
धन्यवाद.

...........तर मला अनेकांनी मदत केल्यावर मला हे प्रचि प्रकरण थेट इथे द्यायला जमलेलं आहे!!!!!!!!!!! :आनंदाने नाचणारी बाहुली:

मदत केलेल्या सर्वांचे (सिंडरेला, नंद्या यांचे) मनःपूर्वक आभार! Happy

प्रज्ञा, माझ्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे हा ! फारच सुंदर आहे हि फूले. आणखी बघायला मिळावीत...

पाकळ्या आणि पराग दोन्ही सुंदर झाले आहेत.>>> पराग विकत आणलेले आहेत सगळ्या साहित्याबरोबर.

तुम्ही अगदी कलाकार आहात!>>>>
Blush
कलाकार असणं वगैरे फार लांबची गोष्ट आहे हो माझ्यासाठी!! माझ्या हस्तकलेच्या बाई शिकवत गेल्या, मी करत गेले एवढंच!
आता जेव्हा उद्या क्लास संपणार आहे, आणि परवापासूनच मला माझ्या प्रतिभेला कौल लावायचा आहे, तेव्हा खरी कसोटी! Happy

प्रज्ञा फारच सुंदर आणी सुबक आहेत फुलं.
कलाकार असणं वगैरे फार लांबची गोष्ट आहे हो माझ्यासाठी!! <<< अगं कलाकुसर म्हणून ती जी काही चार फुलं एकत्र केलीत तितक्या सौंदर्य दॄष्टीचीही ईथे मारामार आहे. Happy खरंच खूप छान!! पुढच्या कलाकृतीचे फोटो पण जरूर येउदेत.

मला ते पिवळे फुल नैसर्गिक वाटले आतल्या परागांसकट Happy

प्रज्ञा मस्त केलेयस सगळे. पुढच्या कामांचे फोटो टाक इथे जमेल तसे

Pages