संभ्रमात

संभ्रमात मी

Submitted by MallinathK on 22 December, 2010 - 00:50

डॉ.कैलास यांच्या या उपक्रमात दिलेल्या मिसर्‍यावरुन सुचलेली गझल. जाणकारांचे मार्गदशन अपेक्षीतच आहे.

उमजले न मला कसा गुंतलो तुझ्यात मी
सावली दिली तुला नि राहिलो उन्हात मी

शोधू नकोस मजला तुझ्या आसवातही
हो, हरवले स्वतःला तुला शोधण्यात मी

निसटुन गेली रात्र तुझ्या आठवांसवे
रमलो होतो तेव्हा कुठे चांदण्यात मी

नको चिंब पाऊस... न हवी सांज मखमली
हलकेच सखे स्पर्श तुझा... अन नभात मी

न भिजल्या क्षणात मी... न ओल्या श्वासात मी
तुझ्या माझ्या नात्याच्या संभ्रमात मी.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - संभ्रमात