नवरा विकला दीड कोटीत
Submitted by Madan Hunkare on 15 August, 2026 - 03:04
मध्यप्रदेशात भोपाळ नावाचं एक शहर आहे.
हा विषय नाही आपला. भोपाळमधे एक चौकोनी कुटुंब राहत होतं.
नवरा बायको दोन मुली. खूप छान संसार चालू होता. आता मोठी मुलगी १६ वर्षांची झाली तर धाटकी १२ वर्षांची.
बायकोच्या लक्षात आलं कि गेल्या चार पाच वर्षात नवरा बदललाय. साध्या साध्या गोष्टीत चिडायचा. पूर्वीसारखं मुलींना प्रेम देण्याऐवजी खेकसायचा. सतत चॅटींग करत रहायचा. गालातल्या गालात हसायचा.
बायकोनं डायरेक्ट विचारलं "माय डिअर अहो, तुमचं कुठे अफेअर चाललंय का? एखादी तरूण मुलगी आहे का?"
यावर नवरा एकदम चिडला. बायकोनं वर्मावर बोट ठेवावं हे कुठल्या नवर्याला आवडेल?
शब्दखुणा: