आषाढ वारी २०२६

वारकरी ते धारकरी

Submitted by विक्रम मोहिते on 16 July, 2026 - 13:27

फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एकदा एका जंगलातून वारी निघाली होती. एक अनुभवी म्हातारा माणूस आणि त्याचा तरुण नातू दोघे त्या वारीचं नेतृत्व करत होते. आजोबा नातवाच्या गप्पा अगदी रंगात आल्या होत्या आणि तितक्यात- जंगलाची हवा पालटली, तुफान वेगाने वारे वाहू लागले, कर्कश्य शिट्ट्या वाजू लागल्या, आणि बघता बघता त्या सगळ्यांना दरोडेखोरांच्या टोळीने घेरलं, मुखियाने त्या तरुण पोराची बॅग पकडली आणि सर्वांना उद्देशून म्हणाला, जे काही सोबत आहे ते इथे सोडून निघा, नाहीतर सगळ्यांची खांडोळी करतो कि नाही बघा.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - आषाढ वारी २०२६