तुला पाहते रे......(विडंबन)
Submitted by मिरिंडा on 18 June, 2026 - 04:19
तुला पाहते रे,तुला पाहते
जरी बाटली मी तुला पाहते ......(ध्रुपद)
पडताचि तुजला धरी ना कुणी रे
तुझ्या संगतीला न येई कुणी रे
तुला लोळण्या सौख्य वाटे गटारी
घाणीची परवा नको तू करू रे.......(ध्रु)
तुझे रंग ढंग किती दिसताती
तुझे शिव्याशाप न कुणा लागताती
तुझ्या अंतरीची मदिरा वदे रे
तुला सर्व अंदाज येती कसे रे ......(ध्रु )
चखणा हवा की स्टार्टर हवे रे
तुझे ऐकण्या हा वेटर उभा रे
तुझ्या जवळिचा अर्थ पाहूनि घे रे
उगा बाउन्सरा चान्स देऊ नको रे.....(ध्रृ)
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा: