ॐ नमस्ते गणपतये ....
Submitted by मिरिंडा on 20 May, 2026 - 04:29
आमच्या समोरच्या चाळीत एक जागा गेली सात आठ वर्ष तरी रिकामी होती. आमच्या मनात तीही जागा घरमालकाला भेटून भाड्याने घेण्याचे होते. तिथे पूर्वी कोणी एक एक्कलकोंडं कुटुंब राहात असे, असं आमचे बाबा सांगत. पण मागच्या रविवारी सकाळी एक नवीन कुटुंब राहायला आलं. आई, वडील आणि दोन मुलगे. मोठा आयुर्वेदिक डॉक्टर , लहान बेकार तरूण. बहुतेक पदवी धारक असावा . का कोण जाणे, मला आयुर्वेदिक डॉक्टरांचा फार राग आहे. ( कारण काहीही नाही, एखाद्या मनुष्याचा आपण कसा अनुभव न घेता राग धरून असतो, तसा. ). तसा त्यांनी आमच्याशी फारसा संबंध ठेवला होता असेही नव्हते. डॉक्टर नेहेमी ओळखीचे हासू हासायचे. मी पण हासायचो.
विषय:
प्रांत/गाव: