अर्थ

या खेळावर!

Submitted by नीधप on 28 April, 2011 - 23:24

एक जुनाच शब्दखेळ
---------------------------
अर्थहीन सुरावटींना पाय फुटले,
रूणझुणत भिंगोरल्या त्या
याच्या कानावर,
त्याच्या बोटांमधे

आडवळणाची लय त्यांची
घुमघुमत उगवत गेली
तुझ्या गाभ्यावर
माझ्या मनावर

मनावर लयीचे लाखो धुमारे
सरसरत पेटत राह्यले
ह्या देहावर
त्या वळणावर

देहाची वळणे पाकळी पाकळी
रिमझिम कोरत गेली
इथल्या हवेवर
या घटीकेवर

जिथे तिथे बहरलेल्या सुरावटी
मंद मंद झुळकत बसल्या
या खेळावर
या अर्थावर

- नी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

कवितेची ओळख

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

मी सांगतो त्यांना कविता निवडायला
आणि मग ती प्रकाशाकडे धरायला
जणु काही एखादा फोटो ...
किंवा कानाला लावून पहा म्हणतो !

सोडा एक उंदीर कवितेत आणि पहा कसा
तो येतो बाहेर शोधून त्याचा रस्ता.
किंवा हिंडा कवितेच्या दालनात,
दिव्याचे बटण शोधित भिंती चाचपडत !

मला वाटते त्यांनी करावे स्किईंग
कवितेच्या पृष्ठभागावर,
एका बाजुला असलेल्या
कवीच्या नावाला हॅलो म्हणत !

पण त्यांना मात्र ते काही नाही रुचत ..
घेतात ते कविता,
बांधतात एका खुर्चीला आणि
छळ करुन मिळवतात कबुलीजवाब !

जुन्या गादीतला कापुस काढावा
काठीने झोडपून,
तसा काढतात अर्थ कवितेतून !!

प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - अर्थ