आधार कसा शोधावा
Submitted by सरनौबत on 17 February, 2026 - 13:36
२३ डिसेम्बरला वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छांचे अनेक मेसेजेस आले. त्यातील एक SMS Happy Birthday from Aadhar. Your Aadhar needs biometric update, kindly update free of cost at nearest centre असा होता. "कुठलंही सरकारी काम वेळेत केलेलं बरं" हा पूर्वानुभव आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अगदी चारच दिवसांसाठी पुण्याला जाणार होतो. तेव्हाच हे काम उरकून घ्यावं असं ठरवलं. घराजवळ नवसह्याद्री पोस्ट ऑफिस आहे; तिथे आधारची कामे होतात. म्हणून सकाळी साडेनऊलाच पोस्टात जाऊन धडकलो.
विषय: