तिसरे_महायुद्ध

जग महाविनाशकारी तिसर्‍या महायुद्धाच्या उंबरठ्यावर ? - उत्तरार्ध

Submitted by राज अज्ञानी on 10 January, 2026 - 05:38

अमेरिकेत बौद्ध भिक्खूंचा एक चमू आलोक नावाच्या कुत्र्यासोबत शांतीचा संदेश घेऊन पदयात्रा करत आहे. हा कुत्रा जागतिक शांतीचं प्रतिक बनला आहे. हे बौद्ध भिक्खू आणि तो कुत्रा बातम्यांचा विषय आहे. भारतात एका रस्ते अपघातात हा कुत्रा जखमी झाला होता. तेव्हां या दरम्यान भारतात पदयात्रा करत असलेल्या भिक्खूंना हा कुत्रा जखमी अवस्थेत सापडला. त्यांनी त्याच्यावर उपचार केले. त्याला पूर्ण बरा केला. आता तो कुत्रा या भिक्खूंना सोडायला तयार नाही. ते जिथे जातील तिथे तो त्यांच्या सोबतच असतो. अमेरिकेत ठिकठिकाणी या भिक्खूंचे स्वागत होते, कौतुक होते आणि आलोकसोबत सेल्फी काढून घेतल्या जातात.

विषय: 
शब्दखुणा: 

जग महाविनाशकारी तिसर्‍या महायुद्धाच्या उंबरठ्यावर ? - पूर्वार्ध

Submitted by राज अज्ञानी on 10 January, 2026 - 03:37

असे म्हणतात कि जर तिसरे महायुद्ध झाले तर ते शेवटचे असेल.
कारण त्यानंतर जो काही विध्वंस होईल तो महाविनाशकारी असेल. या युद्धात सहभागी असलेल्या आणि नसलेल्याही देशांचे एव्हढे नुकसान होईल कि पुढची दोन तीनशे वर्षे युद्धाचा विचारही मनात येणार नाही. या महायुद्धापासून "तटस्थ" राहणे ही कल्पना भाबडी असेल. कारण त्या महायुद्धात कोणतेही नियम पाळले जाणार नाहीत.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - तिसरे_महायुद्ध