पुणेमुंबईजाम

नववर्षाच्या स्वागताला पुणे मुंबई एक्स्प्रेस वर ४५ किमीची कोंडी

Submitted by राज अज्ञानी on 7 January, 2026 - 09:31

एक दूरचे ओळखीचे गृहस्थ सांगत होते कि ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या दोन्ही दिवशी मुंबई पुणे एक्स्रेस वे जाम झाला होता. गुगल मधे मुंबई पुणे ट्रेफिक जाम / वाहतूक कोंडी असे की वर्डस सर्च म्हणून दिले कि दिसते कि पुणे मुंबई एक्सप्रेस वे वर कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. पण नववर्षाच्या स्वागताला एव्हढा मोठा प्रकार झालाय यावर विश्वास बसला नाही. कारण कुठेही यासंबंधाने ( मला तरी) ऐकू आले नाही कि वाचनात असे काही आले नाही. कुणाचाच विश्वास बसला नाही. कारण जर कुठे बातमी नाही तर यांना ४५ किमी जाम आहे हे गाडीत बसून कसे समजले हा प्रश्न होता.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - पुणेमुंबईजाम