Mandar Khambete

जहाल

Submitted by मंदार खांबेटे. on 13 December, 2025 - 19:06

मी वाचूनी 'अहिंसा' पुरता मवाळ होतो,
दररोज युद्ध झाले, त्यांनी जहाल केले!

जळलो हजारदा मी, होऊन मेणबत्ती,
चोहिकडे निखारे, त्यांनी मशाल केले!

नजरेअखेर सारे, शब्दात बोललो मी,
नाही म्हणावयाही, शंभर सवाल केले!

कुणी निंदता न दुःखी, नाही सुखी स्तुतीला,
द्वैतास माझिया मी, 'त्याला' बहाल केले!

आता असे सुखी मी, जीव एकला परंतु,
हसतो कसा स्वतःशी? याचे बवाल केले!

- मंदार खांबेटे ©
#कवी_मी ♥️

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - Mandar Khambete