धर्मेंद्र

ही मॅन ! आता आपल्यात नाही..

Submitted by रानभुली on 24 November, 2025 - 09:42

धर्मेंद्र गेले ही बातमी विश्वास बसण्यासारखी नव्हती.

कारण चारच दिवसांपूर्वी त्यांच्या निधनाच्या अफवा व्हायरल झाल्या होत्या. निधनाच्या अफवेने आयुष्य वाढतं असं म्हणतात. या म्हणीचं प्रत्यंतर सुद्धा आलेलं आहे. पण दुर्दैवाने धर्मेंद्र यांना तेव्हढे आयुष्य लाभले नाही.

आजच्या इंटरनेटच्या पिढीला राज कपूर, दिलीपकुमार, देव आनंद माहिती नाहीत. पण धर्मेंद्र माहीत आहेत. काळ किंचितसा अलिकडचा असेल. चित्रपट क्षेत्रात मात्र ती एक पिढी असते. आमच्या चित्रपटवेड्या घरात मात्र या कलाकारांबद्दला एका पिढीकडून दुसर्‍या पिढीला या कलाकारांचे किस्से, चित्रपट याबद्दल सांगितलं जातं.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - धर्मेंद्र