वाटसरू.
वाटसरू
मी वेडवाकडा झरा तू खळखळणार पाणी,
तू मंजुळ मैना अन मी मैनेची मंजुळ वाणी..!
तू मनमुराद जीवनाचा छंदत्या छंदातला मी आनंद,
तू बागेतला सुगंधत्या सुगंधात मी बेधुंद..!
तू नभी चकाकता तारा ..मी धूमकेतू आवारा!
तू श्रावणातली हिरवळ मी उन्हाळ्यातील झळ.!
तू हृदयाची धडधड मी छातीतली कळ..!
तू जीवनाची काठी मी त्या काठीतल बळ..!
तू चांदण्यांची रात्र मी त्या रात्रीचा चांद.!
तुला भरतीची गोडी मी ओहोटी निवांत..!
तू बहरलेलं फुलरान मी बेरंगी फुलपाखरू.!
तू नसंपणारी वाट..मी त्या वाटेवरी वाटसरू..!
❤️सतीश.