वाटसरू.

Submitted by सतिष on 24 November, 2025 - 05:53

वाटसरू
मी वेडवाकडा झरा तू खळखळणार पाणी,
तू मंजुळ मैना अन मी मैनेची मंजुळ वाणी..!
तू मनमुराद जीवनाचा छंदत्या छंदातला मी आनंद,
तू बागेतला सुगंधत्या सुगंधात मी बेधुंद..!
तू नभी चकाकता तारा ..मी धूमकेतू आवारा!
तू श्रावणातली हिरवळ मी उन्हाळ्यातील झळ.!
तू हृदयाची धडधडमी छातीतली कळ..!
तू जीवनाची काठी मी त्या काठीतल बळ..!
तू चांदण्यांची रात्रमी त्या रात्रीचा चांद.!
तुला भरतीची गोडीमी ओहोटी निवांत..!
तू बहरलेलं फुलरानमी बेरंगी फुलपाखरू.!
तू नसंपणारी वाट..मी त्या वाटेवरी वाटसरू..!
❤️सतीश.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults