कोण?
Submitted by Meghvalli on 21 September, 2025 - 02:27
नकळत कैसै होते सुरवंटाचे फुलपाखरू,
कोण पोशितो वाळवंटी उंच हिरवे तरू.
सूर्योदयीच का कुसुम फुलते,
कोण कळ्यांत भरते वारु,
का बगळ्यांची माळ फुले आकाशांत त्याच आकारू.
स्वर नी व्यंजन किती ही असले तरी मुळ नाद तो ओंकारु,
नाद ब्रम्ह हा ब्रम्हांडात या झाला कसा साकारु.
कोण सांगेल उत्तर यांचे, कोणास मी विचारू.
तो सर्व साक्षी कोण आहे, कोण माझा सदगुरू.
शनिवार, २०/९/२५ , ०८:३५ PM
अजय सरदेसाई -मेघ
meghvalli.blogspot.com