पाककृती स्पर्धा २ - हेल्दी शुगरफ्री लाडू इन पीनट बटर - मंजूताई
Submitted by मंजूताई on 4 September, 2025 - 00:13
मागच्या वर्षी वारी चुकली जरा चुटपुटच लागली होती…. तशी चुटपुट ह्यावर्षी नको लागायला … लगे रहो म्हणत एक झटपट विना कष्टाची रेसिपी सुचली होती तर आज जरा रिकामा वेळ मिळाला आहे तर टाकूनच द्यावी म्हटलं रेसिपी. प्रथेप्रमाणे नमनाला थेंब टाकलाय आता पाककृतीकडे वळू. फोटोत दिसतंय ते सगळं घ्यायचं आपल्या आवडीप्रमाणे. किसलेलं खोबरं ठरवलं होतं पण विसरले (वय) . सगळं साहित्य मिक्सरमध्ये फिरवून पूड करायची. बदाम, काजूची थोडी भरड , थोडं जास्त फिरवून तेल सुटेपर्यंत गंधासारखे वाटून घ्यायचे.
विषय:
शब्दखुणा: