पाककृती स्पर्धा २ - हेल्दी शुगरफ्री लाडू इन पीनट बटर - मंजूताई

Submitted by मंजूताई on 4 September, 2025 - 00:13

मागच्या वर्षी वारी चुकली जरा चुटपुटच लागली होती…. तशी चुटपुट ह्यावर्षी नको लागायला … लगे रहो म्हणत एक झटपट विना कष्टाची रेसिपी सुचली होती तर आज जरा रिकामा वेळ मिळाला आहे तर टाकूनच द्यावी म्हटलं रेसिपी. प्रथेप्रमाणे नमनाला थेंब टाकलाय आता पाककृतीकडे वळू. फोटोत दिसतंय ते सगळं घ्यायचं आपल्या आवडीप्रमाणे. किसलेलं खोबरं ठरवलं होतं पण विसरले (वय) . सगळं साहित्य मिक्सरमध्ये फिरवून पूड करायची. बदाम, काजूची थोडी भरड , थोडं जास्त फिरवून तेल सुटेपर्यंत गंधासारखे वाटून घ्यायचे. एका बोल (आमच्या भाषेत बाऊल) काढून आवश्यकतेनुसार पीनट बटर टाकत घट्ट गोळा होईपर्यंत कालवून घ्या , लाडू वळा व वेळ व आवड असेल तसे त्याला नटवा, सजवा.
20250903_103550.jpg
टीपा:
१) मनुका वगळू नका थोड्या वाटायच्या, थोडो तुकडे टाकायचे
२) पीनट बटर ॲलर्जी असेल तर साधं बटर वापरा.
३) पोटभरीची तसेच चूल न वापरता अशी टू इन वन पीककृती आहे म्हणून मोठ्ठे लाडू वळलेत. आपल्या आवडीनुसार आकार देता येतील.
४) टिकाऊ असल्याने प्रवासात नेता येतील
५) मधुमेहींना लाडू खाल्ल्याचा आनंद मिळेल.20250903_104729.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त पौष्टिक बिना साखरेचे लाडू..
ह्या वर्षी नेम चुकायला नको म्हणून केलीस हे जास्त भारी वाटतं.

छान दिसतायत लाडू.
पीनट बटर शुगर-फ्री वापरलं का?

>>> फोटोत दिसतंय ते सगळं घ्यायचं आपल्या आवडीप्रमाणे
तरी यादी दिलीत तर बरं होईल असं वाटतं. - तो वरच्या डावीकडच्या वाटीत राजगिरा आहे का?

मस्त दिसताहेत लाडु.

<<पीनट बटर ॲलर्जी असेल तर साधं बटर वापरा.>>
म्हणजे पीनट बटर शुगर-फ्री (झीरो कॅलरी स्वीटनर घातलेले) नसावे.

गोड(सर) चव येण्यास फक्त मनुका का?

शुगर-फ्री म्हटलं की झिरो कॅलरी स्वीटनर असे समजतात.

<<तरी यादी दिलीत तर बरं होईल असं वाटतं.>> +१

>>> शुगर-फ्री म्हटलं की झिरो कॅलरी स्वीटनर असे समजतात.
ओह ओके! मला अनस्वीटन्ड म्हणायचं होतं.

सगळ्यांना मनापासुन धन्यवाद!
राजगीरा लाह्याच आहेत. तुम्ही कुठल्यांही लाह्यांची पीठ घेऊ शकता किंवा सातुचं पीठही चालेल मग डाळवं वगळावे. जवसही भाजून टाकता येतील. पीनट बटर नो ॲडेड शुगर वाले घ्यावे. शीर्षक शुगर फ्री ऐवजी नो शुगर हवं होतं.
घटक पदार्थ: राजगीरा, साळीच्या लाह्या, डाळवं, काजू, बदाम, अक्रोड, भोपळ्याच्या बिया, मनुका व साखर विरहीत पीनट बटर

छान दिसताहेत लाडू. शेंगदाण्याचे लाडू आवडतात, त्यामुळे हे पण आवडतील.
थंडी सुरू झाली कि करून बघेन. तोवर घरी आणलेल्या नो अ‍ॅडेड शुगर पीनट बटर ची एक्सपायरी डेट पण जवळ येईल. मग ते संपवायला चांगली रेसेपी आहे ही.