मास्टरस्ट्रोक

शशक - 2 – मास्टरस्ट्रोक - शर्मिला र.

Submitted by शर्मिला. on 31 August, 2025 - 00:21

शशक - 2 – मास्टरस्ट्रोक - शर्मिला र.

" मला वाटले नव्हते, तू कधी असा वागशील!”

छप्पन ते चौपन्न इंच असा उर धापापत होता. मायबोलीवरचं प्रसिद्ध वाक्य त्यांनी टाकलं. एवढंच मराठी त्यांना येत होतं. आणि समोरच्याला तेवढंही येत नाही ही खात्री होती त्यांना, म्हणून एवढं तरी बोलायची हिंमत झाली होती त्यांची. आजूबाजूला मराठी येणारं कुणीच नव्हतं. महाराष्ट्रातही मराठी बोलणारे फारसे राहिले नव्हते, तर इथे कुठून येणार? पण त्यांनी हिम्मत केली दाखवणे महत्वाचे.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - मास्टरस्ट्रोक